ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

पुण्याच्या चंदननगर घरफोडीतील चोरटे गजाआड:3 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपींना अटक

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे शहरातील चंदननगर भागात घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सोने-चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रोहित नितीन गायकवाड (वय 28, रा. कृष्णानगर, हडपसर) आणि मनीष सुजीत नागपुरे (रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चंदननगर येथील एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबवला होता. गुन्हा केल्यानंतर चोरटे रिक्षातून पसार झाले होते. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये चोरट्यांनी वापरलेल्या रिक्षाचा क्रमांक पोलिसांना दिसून आला, ज्यामुळे तपासाला दिशा मिळाली. तांत्रिक तपासानंतर आरोपी गायकवाड घरफोडी करून सोलापूरला पसार झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला सोलापूरमधून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने साथीदार नागपुरे याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरलेल्या दागिन्यांची विक्री आरोपींनी हडपसर आणि वानवडी येथील सराफांना केल्याचेही समोर आले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे दागिने आणि गुन्ह्यासाठी वापरलेली रिक्षा जप्त केली आहे. आरोपींच्या अन्य कोणी साथीदार आहेत का तसेच आरोपींनी यापूर्वी आरोपींनी कोणकोणते गुन्हे केले आहेत याबाबत देखील पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे. परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, सहायक आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश बडाख, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमोल धस, उपनिरीक्षक किरण नरवडे, पोलिस कर्मचारी मेमाणे, डांगे, कदम, घावटे, किरण घुटे, लहाने, बेंद्रे, तसेच लष्कर वाहतूक विभागातील सहायक फौजदार गणेश येळे आणि लोकरे यांनी ही कारवाई यशस्वी केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर