ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

मराठवाड्यात पहिला ग्रासलँड सफारी प्रकल्प अंबाजोगाईत होणार:पर्यटकांसाठी 5 वाहने खरेदी करणार; 100 हेक्टर क्षेत्रावरील प्रकल्पासाठी आराखडा सादर

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अंबाजोगाई येथे मराठवाड्यातील पहिला ग्रासलँड सफारी प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी 11.5 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या सफारीमध्ये विविध 27 विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. या सफारीला हिरवेगार करण्यासाठी 100 हेक्टर क्षेत्रावर गवत लागवड करण्यात येणार असून, पर्यटकांसाठी 5 सफारी वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. अंबाजोगाईच्या मुकुंदराज परिसरात हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. येथे वन विभागाचे 1,328 हेक्टर वनक्षेत्र आहे. हा परिसर डोंगरदऱ्यांनी वेढलेला गवताळ भाग असल्याने ग्रासलँड सफारीसाठी अनुकूल मानला जात होता. त्यानंतर तेथे ग्रासलँड सफारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठवाड्यातील पहिली ग्रासलँड सफारी असणार आहे. त्या दृष्टीने येथील जंगल विकसित करण्यात येणार आहे. या भागात सध्या दोन बिबटे, हरीण, काळवीट आणि नीलगायी आढळतात. नुकतेच वन विभागाने 33 काळवीट जंगलात सोडले आहेत. वन पर्यटन विकास योजनेंतर्गत 2025 ते 2027 या कालावधीसाठी हा आराखडा तयार केला असून, त्यामध्ये 27 विविध विकासकामांचा समावेश आहे. सफारीमध्ये प्राणी पाहण्याची संधी ग्रासलँड सफारी पार्कमध्ये गवताळ प्रदेशातील वन्यजीवांसाठी त्यांचा नैसर्गिक अधिवास असतो. पर्यटकांना ते जवळून पाहण्याची संधी मिळते. येथे प्राणी पिंजऱ्यात बंद नसतात. विस्तीर्ण गवताळ प्रदेशात ते मुक्तपणे फिरतात. पर्यटकांना सुरक्षित वाहनांमधून या भागात फिरवले जाते, जेणेकरून ते प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक रूपात पाहू शकतात. ग्रासलँड सफारी पार्कमध्ये प्रामुख्याने काळवीट, चिंकारा, नीलगाय, चौसिंगा आणि विविध प्रकारचे हरीण, लांडगे, कोल्हे, तरस आणि बिबट्या हे प्राणी असतात. महाराष्ट्रात या संकल्पनेवर आधारित ‘पुणे ग्रासलँड सफारी पार्क’ किंवा सोलापूरमधील नानज माळढोक अभयारण्य यांसारखे प्रकल्प प्रसिद्ध आहेत. आराखडा सरकारला सादर अंबाजोगाई ग्रासलँड सफारी पार्कचा विकास आराखडा सरकारला सादर केला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 11.5 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. – प्रमोद लाकरा, मुख्य वनसंरक्षक, वन विभाग.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर