ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सुनेत्रा पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र:पत्रात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या नावापुढे पदांचा उल्लेख नाही, राजकीय वर्तुळात चर्चा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्राने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पत्रात केवळ दोनच महत्त्वाच्या पदांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून, सुनेत्रा पवार यांचा ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ तर शिवाजीराव गर्जे यांचा ‘खजिनदार’ असा उल्लेख आहे. विशेष म्हणजे, या पत्रात एकूण 14 पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादी देण्यात आली असली तरी, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह इतर 12 नेत्यांच्या नावापुढे कोणत्याही पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. प्रमुख नेत्यांच्या पदनामाबाबत ठेवलेली ही गोपनीयता राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. अजित पवार यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदनामांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. मात्र सुनेत्रा पवार यांनी नुकत्याच पाठवलेल्या नव्या पत्रात या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या नावांपुढे कोणत्याही पदाचा उल्लेख टाळण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पक्षाची संपूर्ण कार्यकारिणी आणि संबंधित अधिकृत कागदपत्रे सादर करणे अनिवार्य असते. या प्रक्रियेचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले. मात्र, या पत्रात केवळ सुनेत्रा पवार यांचा ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ आणि शिवाजीराव गर्जे यांचा ‘खजिनदार’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून, इतर कोणत्याही पदाधिकाऱ्याच्या नावापुढे त्यांच्या पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, ज्यावेळी सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली, त्याच वेळी प्रफुल्ल पटेल यांची ‘राष्ट्रीय कार्याध्यक्ष’ आणि सुनील तटकरे यांची ‘प्रदेशाध्यक्ष’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. असे असतानाही निवडणूक आयोगाला दिलेल्या अधिकृत पत्रात या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या पदनामांचा उल्लेख का टाळण्यात आला असल्याचे पाहायला मिळत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर