ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात…

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Bengaluru Double Death Case : दोन जिवाभावाच्या मैत्रिणी… लहानपणापासून एकत्र वाढलेल्या आणि एकमेकांना जीव लावणाऱ्या मैत्रिणींनी गुरूवारी आयुष्याचा शेवट केला. 22 वर्षांची सिरजना आणि 23 वर्षांची रीता या दोन्ही तरुणी नेपाळच्या रहिवासी होत्या. दूरच्या नातेवाईक असलेल्या या दोघींचे बालपण एकत्र गेलं होतं. 6 ऑगस्ट रोजी एकाच झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवलं. घटनेच्या आदल्या दिवशी दोन्ही तरुणी नातेवाईकांकडे दुपारी जेवणासाठी एकत्र आल्या होत्या. त्यानंतर असं काय झालं की, दोघांनी मृत्यूला कवटाळलं?
एकत्र राहण्याची आणि लग्न करण्याची इच्छा
बेंगळुरूत राहणाऱ्या सिरजना आणि रीता यांना वयाच्या वाढत्या टप्प्यावर त्यांच्या बालपणीच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. दोघींना लग्न करून आयुष्यभर एकत्र राहायचं होतं. या तरुणींना समलैंगिक संबंधांमुळे समाजात आणि कुटुंबात स्वीकारले न जाण्याची भीती होती. या मानसिक दबावातून त्यांनी 6 ऑगस्ट रोजी एकाच झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवलं. जेव्हा त्यांनी एकत्र राहण्याची आणि लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी या नात्याला तीव्र विरोध दर्शवला.

Solapur : ‘आई, मी येतो गं…’ म्हणत निघाला अन् परत आलाच नाही; मृत्यूच्या काही मिनिटाआधी भावोजींना केला फोन!
समाजात कधीही एकत्र राहू शकणार नाही
नेपाळमधील त्यांच्या मूळ गावी या नात्याबद्दल चर्चा आणि अफवा पसरू लागल्या. या परिस्थितीमुळे बेंगळुरू येथे राहणाऱ्या नातेवाईकांनी त्यांना आपल्याकडे बोलावून घेतले. रीता ही बेंगळुरूतील फ्रेझर टाऊन भागात राहत होती, तर सिरजना जक्कूर भागात राहत होती. आपण या समाजात कधीही एकत्र राहू शकणार नाही आणि कुटुंब आपल्याला वेगळे करेल, या भीतीमुळे त्या प्रचंड नैराश्यात होत्या. सामाजिक नकार आणि विभक्त होण्याच्या भीतीने 6 ऑगस्ट रोजी दोघींनी बेंगळुरू येथे एकाच झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
आकस्मिक मृत्यूची नोंद
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सखोल तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जातील.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर