ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

कोल्हापूरच्या राजकारणात टक्केवारीचा बॉम्ब:आमदार राजेश क्षीरसागरांचा कमिशन व्हिडिओ व्हायरल; 40 लाखांच्या व्यवहाराचा दावा

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक आणि मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी थेट सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा एक कथित व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर करत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. विकासकामांच्या टेंडरमधील टक्केवारीवरून हा वाद झाला असून, संबंधित व्यक्तीने आमदार क्षीरसागर यांना तब्बल ४० लाख रुपये दिल्याचा दावा इंगवले यांनी केला आहे. या व्हिडिओमुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. रविकिरण इंगवले यांनी सार्वजनिक केलेला हा कथित व्हिडिओ कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील एका ठिकाणचा असल्याचे सांगितले जात आहे, ज्याच्यावर २५ ऑक्टोबर २०२५ अशी तारीख अंकित आहे. व्हिडिओतील संभाषणावरून शासकीय कामाच्या टेंडरसाठी एकूण ७ टक्के कमिशन देण्याबाबत वाटाघाटी सुरू असल्याचे दिसत आहे. यामध्ये ५ टक्के हिस्सा थेट आमदार राजेश क्षीरसागर यांना, तर राहुल आणि प्रशांत नावाच्या दोन व्यक्तींना प्रत्येकी १ टक्के हिस्सा देण्याचे नियोजन करण्यात आले होते. ४० लाखांची देवाणघेवाण ५ टक्क्यांच्या हिशोबाने कंत्राटदाराकडून आमदार क्षीरसागर यांना ४० लाख रुपये पोहोचवले गेल्याचा उल्लेख या संभाषणात आहे. तसेच ‘राहुल’ नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्यावर पैसे वर्ग केल्याची कबुलीही समोरच्या व्यक्तीने दिली आहे. मात्र, अंतिम टप्प्यात हा व्यवहार फिस्कटल्याने संबंधित व्यक्तीने हे व्यवहार अमान्य केल्याचे व्हिडिओत ऐकू येत आहे. दरम्यान दिव्य मराठी डिजीटल या व्हिडिओची पुष्टी करत नाही. हा तर खंडणी आणि दमदाटीचा प्रकार – रविकिरण इंगवले व्हायरल व्हिडिओचा हवाला देत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आमदार क्षीरसागर यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. “विकासकामांच्या कंत्राटांमध्ये ठरलेली टक्केवारी मिळाली नाही, की लोकप्रतिनिधी कशा प्रकारे कंत्राटदारांना त्रास देतात आणि दमदाटी करतात, याचे हे जिवंत उदाहरण आहे,” असा आरोप त्यांनी केला. क्षीरसागर यांचा कमिशनखोरीचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी आपण या प्रकरणी रीतसर पोलिस तक्रार दाखल करणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात तातडीने हस्तक्षेप करून कारवाई करावी, अशी मागणी इंगवले यांनी केली आहे. विरोधक आक्रमक हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कोल्हापूरमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून काँग्रेस आणि मनसेने महायुती सरकारला धारेवर धरले आहे. “आमदार राजेश क्षीरसागर यांच्या ४० लाख रुपयांच्या कथित आर्थिक व्यवहाराची ही चित्रफीत अत्यंत गंभीर आहे. कोल्हापूरच्या जनतेसमोर या प्रकरणाची खरी वस्तुस्थिती येणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आमदार क्षीरसागर यांनी जनतेची दिशाभूल न करता या प्रकरणावर तात्काळ जाहीर खुलासा करावा,” अशी मागणी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. मनसेची टीका तर दुसरीकडे, कोल्हापूर दौऱ्यावर असलेले मनसेचे संपर्क प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “भ्रष्टाचारमुक्त भारताच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात काय करत आहेत, याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. अशा कृत्यांमुळे सर्वसामान्य जनतेचा या सरकारच्या नैतिकतेवरून पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे,” असा टोला त्यांनी लगावला. राजेश क्षीरसागर उद्या भूमिका मांडणार दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आणि गंभीर आरोपांवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी सावध पवित्रा घेतला आहे. या कथित व्हिडिओबाबत विचारले असता, त्यांनी सध्यातरी थेट भाष्य करणे टाळले. “या व्हिडिओ संदर्भात मी माझी सविस्तर भूमिका लवकरच मांडणार आहे. उद्या (रविवारी) मी एक विशेष पत्रकार परिषद आयोजित केली असून, त्यात या संपूर्ण प्रकरणावर सत्य काय आहे ते जाहीर करेन,” अशी माहिती क्षीरसागर यांनी दिली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या या पत्रकार परिषदेकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर