ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही:संतांकडे वाकड्या नजरेने पाहिले तर कार्यक्रमच होणार, नितेश राणेंचा इशारा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शनिवारी शाई फेकण्याचा प्रकार घडला होता. संग्राम भंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून लवांडे यांच्यावर शाई फेकली होती. त्यानंतर अनेकांनी या घटनेचा निषेध केला. लवांडे वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर शाइफेक करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यावर आता भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे राणे यांनी म्हटले आहे. नितेश राणे म्हणाले, या महाराष्ट्रात मोठी संत परंपरा आहे, वारकरी परंपरा आहे. आमच्या संत आणि महाराजांकडे कोणीही वाकड्या नजरेने बघत असेल तर त्या सगळ्यांचे कार्यक्रमच होणार, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. मला जशी ही बातमी समजली, मी बापूंना फोन केला आणि म्हटले की बापू चिंता करू नका, तुमचे सगळे भाऊ मंत्रालयात बसलेले आहेत. तुमच्या केसलाही धक्का लागणार नाही, हा मी बापूला शब्द देऊन टाकला. माझ्या नावाने शिव्या घालत असतील, मला काहीही फरक पडत नाही, असे राणे यांनी म्हटले आहे. माझ्यावरील हल्ल्याचे सूत्रधार नितेश राणे- विकास लवांडे नितेश राणे यांच्या या विधानानंतर विकास लवांडे यांनी देखील पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, माझ्यावर काल जो जीवघेणा हल्ला झाला, त्या संदर्भात फिर्याद देण्यात आली आहे, तरी देखील आरोपींना अटक झालेली नाही, त्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या नाहीत, त्यांचे पिस्तूल जप्त करण्यात आले नाही. कारण या घटनेचे सूत्रधार आज बोलले आहेत, असे म्हणत त्यांनी राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस याची दखल घेतील का? पुढे बोलताना विकास लवांडे म्हणाले, संग्राम भांडारे हे प्यादा असावे आणि या घटनेचे सूत्रधार हे नितेश राणे असावेत. आता जर सरकारमधला मंत्रीच या हल्ल्याचा सूत्रधार असेल तर कोण कोणावर गुन्हा दाखल करणार आणि कोणाला अटक होणार असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो. पोलिसांचे हात बांधलेले असावेत असे मला वाटते. आणि नितेश राणे याचे सूत्रधार आहेत. देवेंद्र फडणवीस याची दखल घेतील का? की त्यांना पाठिंबा देणार? असा सवाल लवांडे यांनी उपस्थित केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर