ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरावर दीड किलो सोन्याचा कळस:शुक्रवारी मंदिरावर बसवणार, गोव्याचे माजी CM प्रतापसिंह राणे यांच्याकडून भेट

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरावर आता सोन्याचा कळस चढवला जाणार आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याकडून मंदिरास कळस देण्यात येणार आहे. हा कळस तब्बल अडीच कोटी रुपयांचा, दीड किलो सोन्यात मढवलेला असून अधिक महिन्यानिमित्त शुक्रवारी तो मंदिरावर बसवण्यात येणार आहे. सध्या महालक्ष्मी मंदिराच्या जतन संवर्धनाचे काम सुरू असून त्याअंतर्गत शिखरावरील दगडी बांधकाम मूळ रूपात आले आहे. शिखर दगडाचे असले तरी कळसाखालील डेरा हा सिमेंटमध्ये बांधलेला आहे. त्यातून पाणी झिरपल्याने तेथे झाडेझुडपे उगवतात. त्यावर उपाय विचारला असता धातूचे कव्हर केले तर चालेल, असे पुरातत्त्व विभागाने देवस्थान समितीच्या वतीने प्रभारी सचिव शिवराज नाईकवाडे यांना कळवले होते. त्यावरून सोन्याच्या कळसाची कल्पना सुचली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांची महालक्ष्मी देवीवर श्रद्धा असल्याने त्यांनी यापूर्वीही अंबाबाईला सोन्याचे अलंकार देणगी म्हणून दिले होते. मागील महिन्यात अंबाबाई दर्शनासाठी ते आले असता त्यांना कळसाचा विषय समजला. त्यांनी सोन्याचा कळस करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार आता कळस बवण्यात येणार आहे.
मंदिरांवरील सुवर्ण कळसाचे महत्त्व असे हिंदू मंदिर स्थापत्यशास्त्रानुसार, शिखरावरील कळस हा विश्वातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचे केंद्र मानला जातो. कळसावर सोन्याचा मुलामा चढवल्याने मंदिराची धार्मिक भव्यता तर वाढतेच, शिवाय हवामानातील बदलांपासून शिखराच्या मूळ रचनेचे दीर्घकाळासाठी संरक्षण होते, असे तज्ज्ञ सांगतात. कोल्हापूर हे देशातील प्रमुख धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाते. नव्या सुवर्ण कलशामुळे मंदिराच्या वैभवात आणखी भर पडेल, असेही सांगण्यात येत आहे. हिंदू धर्मात अधिकमासाचे आहे विशेष महत्त्व हिंदू धर्मामध्ये अधिक महिना हा पवित्र मानला जातो. या काळात केलेले दान, पुण्यकर्म आणि मंदिरांचे जीर्णोद्धार विशेष फलदायी ठरतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. धार्मिक ग्रंथांनुसार, या विशेष पर्वकाळात देवळात सुवर्ण किंवा मौल्यवान वस्तू अर्पण केल्याने घरात सुख-समृद्धी लाभते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, असे सांगण्यात येते. दरम्यान, अधिक महिन्यात देवीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करताना दिसत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर