ब्रेकिंग न्यूज
⚡ मारेगाव–यवतमाळ महामार्गावर अज्ञात वाहनाची रोह्याला धडक! ✦ ⚡ घोडदरा शिवारात वाघाचे पगमार्क; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! ✦ ⚡ ‘एचआयव्ही’ग्रस्त असल्यानं पत्नी सोडून गेली; पुण्यात चुलत्यानं अल्पवयीन पुतणीवरच केला अत्याचार, जामीन अर्जाव… ✦ ⚡ IND vs NZ : केएल राहुल 5 रनवर असताना मैदानात मोठा ड्रामा… हेन्रीला कॅप्टनने वेड्यात काढलं, पण पुढच्या 2 म… ✦ ⚡ MPSC गट-क परीक्षेसाठी जम्बो भरती, तुम्ही करताय तयारी? अनुभवी विद्यार्थ्यांनी दिले 5 सिक्रेट टिप्स! Video ✦ ⚡ CRIME : ‘आई कुणीतरी मला ब्लॅकमेल करतंय’, हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरून 20 वर्षाच्या तरुणाचा संशयास्पद मृत… ✦ ⚡ Chandrapur News : चौकात मानवी कवटी, रुळाजवळ छिन्नविच्छिन्न मृतदेह; चंद्रपुरात खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलि… ✦ ⚡ Chandrapur News : चौकात मानवी कवटी, रुळाजवळ छिन्नविच्छिन्न मृतदेह; चंद्रपुरात खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलि… ✦ ⚡ Chandrapur News : चौकात मानवी कवटी, रुळाजवळ छिन्नविच्छिन्न मृतदेह; चंद्रपुरात खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलि… ✦ ⚡ अनैतिक संबंधांचा वाद, पत्नीला झोपेतच संपवलं, मग 65 वर्षाच्या पतीचं टोकाचं पाऊल, बीड हादरलं!
SP News Maregaon

अनैतिक संबंधांचा वाद, पत्नीला झोपेतच संपवलं, मग 65 वर्षाच्या पतीचं टोकाचं पाऊल, बीड हादरलं!

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बीड: पत्नीच्या हत्येनंतर फरार झालेल्या पतीने स्वतःच्या शेतात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बीडमधून पुढे आला आहे. विष्णू गणपत कदम असे मृत पतीचे नाव आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शिरूर तालुक्यातील आनंदवाडी येथे ही घटना घडली. पत्नीच्या हत्येनंतर अवघ्या दोन दिवसांत पतीनेही टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ उडाली.

आनंदवाडी येथील विष्णू कदम आणि त्याची पत्नी भिवराबाई कदम (वय 55) यांच्यात पतीच्या अनैतिक संबंधांवरून वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. याच वादातून सोमवारी पहाटे घरात झोपलेल्या भिवराबाई यांच्या डोक्यात दगड घालून विष्णू याने त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत महिलेचा मुलगा सुनील विष्णू कदम याच्या फिर्यादीवरून वडील विष्णू कदम यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दिवाळीला सुट्टीवर आला अन् घात झाला, हवाई दलाच्या जवानाचा करूण अंत, सख्खा भाऊ गंभीर जखमी

पत्नीच्या हत्येनंतर विष्णू कदम घटनास्थळावरून फरार झाला होता. त्यामुळे चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी सचिन इंगळे यांनी त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके नियुक्त केली होती. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अनपेक्षित घटना घडली. विष्णू कदम याने स्वतःच्या शेतातील कपाशीच्या पऱ्हाट्यांच्या ढिगाला आग लावली आणि त्यात उडी घेतली. या घटनेत गंभीर भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान पत्नीची हत्या आणि त्यानंतर पतीने केलेली आत्महत्या या दोन्ही घटनांमुळे आनंदवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या दुर्दैवी घटनांमुळे एका कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेल्या संशयित पतीचाही मृत्यू झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या घटनेचा पुढील तपास चकलांबा पोलीस करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर