ब्रेकिंग न्यूज
⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video ✦ ⚡ IAS Tukaram Mundhe : MPSC चौकशी समितीवर नियुक्ती अन् FDA मधून बदलीची चर्चा; अखेर तुकाराम मुंढेंनी मौन सोडलं… ✦ ⚡ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत नाव असेल तर लगेच करा हे काम ✦ ⚡ Kolhapur Crime: एकत्रच जीव देणार होतो पण…, प्रियकराचा शॉकिंग खुलासा, कोल्हापूरला हादरवणाऱ्या प्रकरणात नेम… ✦ ⚡ Dhruv Rathee : मॅकेनिकल इंजीनियरिंग ते जर्मनीत उच्च शिक्षण! पाहा कसा आहे ध्रुव राठीचा शैक्षणिक प्रवास
SP News Maregaon

Anaya Bangar : ऑस्ट्रेलियाकडून संधी मिळताच अनाया बांगरने BCCI वर व्यक्त केली नाराजी! पुरूषाची स्त्री झाली प…

9 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Anaya Bangar Cricket : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर हिच्यासाठी ऑस्ट्रेलियामधून गुड न्यूज समोर आली आहे. अनाया बांगरला ऑस्ट्रेलियामधील बिग बॅश लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका अटीसह ग्रीन सिग्नल दिल्याने क्रिडाविश्वात चर्चेला उधाण आलं आहे. पत्रकार परिषद घेत अनायाने सर्वांना याबाबत माहिती दिली होती. अशातच आता ऑस्ट्रेलियात खेळण्याची संधी मिळाल्यानंतर आता अनायाने बीसीसीआयवर नाराजी व्यक्त केली आहे.
बीसीसीआयशी पहिल्यांदा संपर्क साधला तेव्हा…
अनाया बांगर हिने 2022 मध्ये जेंडर ट्रान्सिशन प्रक्रिया सुरू केली होती. त्यानंतर तिला इंडिया वुमेन्स टीमसाठी क्रिकेट खेळायचं होतं. 25 वर्षांची अनाया हिने भारतीय महिला क्रिकेट संघात प्रवेश करण्यासाठी बीसीसीआयशी संपर्क साधला होता. परंतु बोर्डाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्यानं तिने निराशा व्यक्त केली आहे. ‘वुमेन्स टीमचा भाग होण्यासाठी मी मदतीकरिता बीसीसीआयशी पहिल्यांदा संपर्क साधला, तेव्हा मला कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही, ज्यामुळे मला खूप दुःख झालं’, असं अनाया बांगर म्हणाली.

VIDEO | Delhi: Trans-athlete Anaya Bangar, a left-arm spin-bowling all-rounder and daughter of former India player and decorated coach Sanjay Bangar, says she was heartbroken after being ‘served with silence’ by the BCCI when she first approached the Board for assistance in… pic.twitter.com/kRh8lqwX7I
— Press Trust of India (@PTI_News) August 28, 2026

मला आशा आहे की बीसीसीआय…
"मला कोणताही प्रतिसाद न मिळणं अत्यंत निराशाजनक आणि हृदयद्रावक होतं. लिंगबदलाच्या प्रक्रियेमुळे मला क्रिकेटपासून दूर जावे लागेल, याची मला कल्पना होती. मला आशा आहे की बीसीसीआय या गोष्टीचा सकारात्मक विचार करेल आणि या विषयाशी संबंधित धोरणे तयार करण्याचा प्रयत्न करेल, कारण भारतात अशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण आहे, असंही अनाया बांगर म्हणाली आहे.

मुलाची मुलगी झालेली अनन्या बांगर खेळणार ऑस्ट्रेलियात! क्रिकेट बोर्डाने ठेवली ही एकच अट, कोणती?
अनाया बांगर म्हणाली….
दरम्यान, संघाचा भाग होण्यास आणि माझ्या संपूर्ण प्रवासातील अनुभव व शिकवण मांडण्यास मला नक्कीच आवडेल. तसेच भविष्यात आपल्या देशासाठी आणि महिलांच्या खेळासाठी काय सर्वोत्तम ठरेल, याबद्दलही माझे विचार मांडायला मला आनंद होईल," असंही अनाया बांगर म्हणाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने 2023 मध्ये ट्रान्सजेंडर महिला खेळाडूंवर आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट खेळण्यास काही नियम लागू केले होते. परंतु क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मदतीमुळे अनाया आता स्थानिक स्तरावर 100 टक्के खेळण्यासाठी सज्ज झाली आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर