ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बोरी (गदाजी ) येथील 48 वर्षीय शेतकऱ्याची कीटक नाशक प्राशन करून आत्महत्या.

64 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

मारेगाव तालुक्यात :- एकामगोमाग होणाऱ्या आत्महत्यांचे सत्र संपतांना दिसत नाही.काही दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा आज सकाळी आत्महत्या झाल्याने तालुका पुरता हादरून गेलेला आहे.महादेव भाऊराव बेंडे वय सुमारे 48 वर्षे असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असून तो मारेगाव तालुक्यातील बोरी (गदाजी),येथील राहिवासी होता.

महादेव हा आपल्या कुटुंबा सोबत बोरी (गदाजी) येथे राहायचा.त्यांना सुमारे चार एकर शेती असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.तो शेती करुण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा परंतु यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व गेल्या तीन वर्षापासून तालुक्यातील काही भागात पूरबुडाई होत असल्याने नुकसानीमुळे बळीराजा पुरता मेटाकुटीस आला असुन शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडलेले आहे.

साधा लागवडीचा खर्च सुद्धा निघायची वेळ नसल्याने शेतकरी हवालदिल झाला.अशाच अवस्थेत असलेल्या महादेवने आज दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोज सोमवारला पहाटे 4 वाजताच्या सुमारास बोरी (गदाजी) येथे स्वतच्या राहते घरी कीटक नाशक प्राशन करत यात ते जागीच गतप्राण झाले.यावर्षीही पुराचे पाणी महादेव यांचे शेतात शिरल्याने शेतीच्या झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे मृत महादेव हे आर्थिक विवंचनेत असल्याने आत्महत्ये सारखे धक्कादायक पाऊल उचलले असल्याची माहिती आहे.

तालुक्यात सतत आत्महत्या होत असल्याने तालुक्यात काय चाललेले आहे.असा प्रश्न सर्वच स्तरातून उपस्थित होतांना दिसत आहे.महादेव याचे पश्चात आई,पत्नी, एक मुलगा,एक मुलगी,असा आप्त परिवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव येथील ठाणेदार जनार्धन खंडेराव यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार राजु टेकाम करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर