ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

35 वर्षीय शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

2.2k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुक्यातील केगांव येथील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील केगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोज मंगळवारला सकाळी 9:30 वाजता उघडकीस आली.

पवन आण्याजी पिंपळशेंडे वय अंदाजे 35 वर्षे असे विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे.

पवन याचे कडे चार एकर शेती असल्याची माहिती आहे.तो शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.आज सकाळी तो शेतात जातो म्हणून घरी सांगून गेला होता. त्याने स्वतःचे शेतात मोनोसील नामक कीटकनाशक प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली.

कुटुंबातील काही सदस्य शेतात गेले असता सदर घटना उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.मृतक पवन यांच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगा असा आप्त परिवार आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे मार्गदर्शनाखाली जमादार आनंद अलचेवार करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर