ब्रेकिंग न्यूज
⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ…
SP News Maregaon

देवाळा येथील युवा शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

100 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील देवाळा येथील युवा शेतकऱ्याने नापिकी व जीवनाला कंटाळलेल्या शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक प्राशन करून स्वतःचे जीवन संपविले. ही घटणा आज दिनांक 28 डिसेंबर 2022 रोज बुधवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की.
जनार्दन कवडू महाकुलकर वय सुमारे 38 वर्षे रा.देवाळा असे आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे नाव असून तो नेहमी प्रमाणे सकाळी घरुन शेतात गेला होता स्वतःचा शेतात कीटकनाशक प्राशन केलेल्या अवस्थे मध्ये शेतात पडून असल्याचे कुटुंबातील सदस्यांच्या व आजु बाजुच्या शेतातील शेतकऱ्याचा निदर्शनास येताच घटना उघडकीस आली.

त्यांनी लगेच त्याला मारेगांव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणत असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला.असून त्यांच्या वडीलांच्या नावाने देवाळा येथे सुमारे 5 एकर शेती असल्याची माहिती सूत्रांनकडून प्राप्त झाली आहे.

यावर्षी पडलेला अती वृष्टी व ओला दुष्काळ आणि मागील काही वर्षांपासून होत असलेली नापिकी यामुळे तो आणि कुटुंबीय कर्जाच्या खाईत लोटलेले होते.जनार्दन यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामदार राजु टेकाम करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर