ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

कत्तलीकरिता नेणाऱ्या 17 गोवंशीय जनावरांची पाटण पोलिसांकडून सुटका

154 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी दि.08/02/ 2024 रोजी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांना काही इसम गोवंशीय जनावरे पायी आंबेझरी ते शिबला रस्त्याने तेलंगाना राज्यात कत्तली करिता घेऊन जात असल्याबाबत माहिती मिळाली.

पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस अंमलदार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कडील अंमलदार यांचे पथक तयार करून पाटण व मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीवरील आंबेझरी-शिबला जंगल परिसरातून माहितीनुसार पोलीस पथकाने सापळारचून अटक केली आहे.


मिळालेल्या माहिती पोलिस पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन तीन इसमांना 17 गोवंशीय जनावरांसह पकडले व त्यांची विचारपूस केली असता सदर इसमांनी ते तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे सदरचे 17 गोवंशीय जनावरे कत्तलिकरीता विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.त्यावरून पोलिसांनी सदर तीन इसमांना २ लाख १२ हजार रुपये किमतीच्या जनावरांसह ताब्यात घेतले व जनावरे चैतन्य गोरक्षण ट्रस्ट मांडवी येथे दाखल केले.

जनावरे पायी घेऊन जाणारे मजूर व त्यांचे मालक अशा एकुन सहा आरोपी नामे ,मंगेश रामकृष्ण मेश्राम रा.माथार्जुन ,सदाशिव गोविंदा मडावी रा.माथार्जुन ,प्रवीण शंकर दुधकर रा.सुसरी ,शेख नजीर शेख हसन रा.पाटनबोरी ,फकीर मोहम्मद शेख बशीर रा.मारेगाव ,शेख जमीर शेख रहमान रा.पाटनबोरी या आरोपींना विरुद्ध पोलीस स्टेशन पाटण येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन सदर जनावरांना गोरक्षण ट्रस्ट येथे दाखल करण्यात आले.


सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड,अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप,उपविभागीय पोलीस अधिकारी वणी गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनात पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील,पोलीस अंमलदार विजय वानखेडे, प्रदीप ठाकरे,अतुल अमोल नुन्नलवार,सुरेश राठोड,अमित पोयाम,प्रशांत तलांडे, हेमंत कामतवार, रतिष वानखेडे, यांनी केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर