ब्रेकिंग न्यूज
⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट ✦ ⚡ Nana Patekar Death : तब्बल 45 मिनिटं सुरू होते नाना पाटेकरांना वाचवण्याचे प्रयत्न, पहाटे 5:20 ला काय घडलं? …
SP News Maregaon

IND vs SL : ‘गंभीर काय कामाचा नाही, बारक्या टीमला हरवून खुश होतो’, टीम इंडियाच्या माजी चीफ सिलेक्टरचा जोरदा…

11 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


India vs Sri Lanka : सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली असून दुसऱ्या मॅचमध्ये देखील भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. देवदत्त पेडिक्कलच्या शतकीय कामगिरीनंतर टीम इंडियाने पहिला डाव 503 धावांवर डिक्लेअर केला. अशातच आता टीम इंडियाच्या माजी चीफ सिलेक्टरने गौतम गंभीरवर सडकून टीका केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत गंभीरची कोणतीही भूमिका नाही, असं म्हणत माजी चीफ सिलेक्टरने खडे बोल सुनावले.
गंभीरकडे आता काही काम उरलं नाही
श्रीलंका हा टेस्ट क्रिकेटसाठी चांगला संघ नाही आणि त्यांना हरवल्यास गंभीरला खूप आनंद होईल. श्रीलंका वनडे फॉरमॅटमध्ये चांगला आहे पण टेस्टमध्ये नाही. बारक्या टीमला हरवून काय आनंद मिळतो. गंभीरकडे आता काही काम उरलं नाही. पहिल्या कसोटीत 200 हून अधिक धावा केल्यानंतर तुम्ही त्याला संघातून कसं वगळू शकता? गंभीर काहीही म्हणो, त्याच्याकडे आता काही काम उरलं नाही, असंही श्रीकांत म्हणाले आहेत.भारत ही मालिका नक्कीच जिंकेल. श्रीलंका आणि अफगाणिस्तानसारख्या संघांविरुद्धच्या विजयानंतर गंभीर खूप आनंदी असेल, असं म्हणत त्यांनी गंभीरवर टीका देखील केली आहे.
पुढील दोन मालिका भारताचे भवितव्य ठरवतील – श्रीकांत 
मी गंभीरवर कठोर टीका करत नाहीये. तो एक खूप चांगला खेळाडू आहे आणि त्याच्यामध्ये खेळ समजून घेण्याची क्षमता आहे. त्याला थोडे अधिक संवेदनशील असण्याची गरज आहे. मात्र, एक खेळाडू म्हणून तो खूप चांगला होता, असं म्हणत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न देखील केला. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढील दोन मालिका भारताचे भवितव्य ठरवतील. मला वाटते की दक्षिण आफ्रिका जवळपास अंतिम फेरीत पोहोचली आहे, असंही श्रीकांत यांनी म्हटलं आहे.
भारताला नेहमीच संघर्ष करावा लागला – श्रीकांत 
दरम्यान, न्यूझीलंडमध्ये भारताला नेहमीच संघर्ष करावा लागला आहे. 2024 मध्ये भारताने केवळ बुमराहच्या गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाच्या मनात भीती निर्माण केली होती. केवळ त्याच्यामुळेच भारताने ऑस्ट्रेलियाला जवळपास हरवलं होतं. हे विसरू नका की ऑस्ट्रेलियन संघ बुमराहविरुद्ध खेळायला घाबरत होता. तो प्रतिस्पर्धी संघाच्या मनात जी भीती निर्माण करतो ती अविश्वसनीय आहे, असंही के श्रीकांत म्हणाले आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर