बातमी ऐका (Marathi Voice Reader)
Seema Kumari Broken Shoes Asian Games 2026 : जपानमधील आइची-नागोया येथे झालेल्या 20 व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सीमा कुमारीने महिलांच्या 10000 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेतील महिलांच्या 10000 मीटर प्रकारात भारताला 16 वर्षांनंतर मिळालेलं हे पहिलेच पदक ठरलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमाचे अभिनंदन केले आणि तिच्या जिद्दीचं व कठोर परिश्रमांचे कौतुक केलं. पण सीमासाठी रेस सोपी नव्हती. सीमा कुमारीच्या ऐतिहासिक यशानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
पळताना सीमाचे बूट तुटले अन्….
सीमा कुमारी रेस सुरू होण्याआधी आत्मविश्वासाने उजळून निघाली होती. त्यावेळी तीचं लक्ष फक्त रेस जिंकण्यावर होतं. पण रेस सुरू होताच घोटाळा झाला. शर्यतीदरम्यान सीमाचे बूट तुटले, तिच्या बुटाचा खालचा भाग निघाला अन् तिच्या पंजाला ग्रिप मिळत नव्हती. पण वेदना आणि अडचणींवर मात करून सीमाने रेस चालूच ठेवली अन् रेस पूर्ण केली. सीमाने 10000 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकलं अन् आपलं स्वप्न पूर्ण केलं.
16 yrs of wait ended for the nation but you won’t find people talking about it, just like days ago an athlete was being talked about.
Seema Kumari from Chamba, Himachal won bronze in the women’s 10,000m race at the Asian Games. pic.twitter.com/oZejGaBX7e
— Nikhil saini (@iNikhilsaini) September 25, 2026
जपानला गेली पण आईला सांगितलंच नाय…
हिमाचल प्रदेशातील चंबा येथील एका छोट्या गावापासून ते आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदकापर्यंतचा सीमाचा प्रवास संघर्षमय राहिलाय. सीमाने आपल्या आईला देखील कळवलं नव्हतं की, ती जपानमधील आशियाई खेळांमध्ये खेळायला जाणार आहे. 78 वर्षांच्या आईला जेव्हा कळतं की ती बाहेर देशात जाणार आहे, तेव्हा तिची आई चिंता करत बसते, त्यामुळे तिने आपल्या आईला देखील सांगितलं नव्हतं.
मोठ्या बहिणीलाच सर्व काही माहीत असतं
देशासाठी पदक जिंकल्यानंतर सीमा म्हणाली… "मला वडील नाहीत. माझी आई खूप वयस्कर आहे, सुमारे 78 वर्षांची. माझा जन्म झाला तेव्हा ती 45 वर्षांची होती. मी जेव्हाही बाहेर जाते तेव्हा ती खूप तणावात येते. म्हणूनच मी आशियाई खेळांसाठी जपानला जात आहे हे तिला सांगितलं नाही. तिला बीपीचा त्रासही आहे. कुटुंबात फक्त तिच्या मोठ्या बहिणीलाच सर्व काही माहीत असतं, असं सीमाने सांगितलं". पण मेडल जिंकल्यानंतर तिच्या आईला गुड न्यूज देण्यात आली.
Chamba, Himachal Pradesh: Chamba athlete Seema Kumari won a bronze medal in the women’s 10,000-metre race at the 20th Asian Athletics Championships 2026 in Aichi-Nagoya, Japan. Her achievement marked India’s first medal in the women’s 10,000m event at the championships in 16… pic.twitter.com/Lz0XYxoppn
— IANS (@ians_india) September 25, 2026
सीमाची आई काय म्हणाली?
सीमाची आई, केसरी देवी म्हणतात, "मला खूप आनंद झाला आहे. माझे संपूर्ण कुटुंब, गावातील सर्व लोक, भारतातील तसेच परदेशात राहणारे सर्वजण आनंदी आहेत. माझ्या मुलाची जबाबदारी जेव्हा माझ्यावर आली, तेव्हा तो खूप लहान होता. मला तीन मुली आहेत, त्यापैकी दोघींचे लग्न झाले आहे. त्यांचे लग्न व्हावे यासाठी मी खूप कष्ट केले. ती खूप लहान होती, ती सातवीत शिकत असतानाच एका कीटकाच्या दंशामुळे तिच्या वडिलांचं निधन झाले. त्यानंतर मला प्रचंड हालअपेष्टांचा सामना करावा लागला"