ब्रेकिंग न्यूज
नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए… CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका… Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु…
SP News Maregaon

Sarvesh Kushare : मक्याचा भुस्सा, जुनी कपडं अन् कापूसाची मॅट्रेस! नाशिकचं खेडेगाव, सुविधा नाहीत पण मेहनतीला…

10 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Sarvesh Kushare Record in Commonwealth Games : नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगाव या छोट्याशा गावच्या सर्वेश कुशारे याने जगात नाव गाजवलं आहे. कोणतीही सुविधा नसताना उंच उडीचा सराव करणाऱ्या सर्वेश कुशारे याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला ऐतिहासिक रौप्यपदक पटकावलं आहे. सर्वेशने तब्बल 2.25 मीटर उंच झेप घेत इतिहासात पहिल्यांदाच भारताला उंच उडी स्पर्धेत मेडल पटकावून दिलंय. त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर आपलं नाव सुवर्णअक्षरांनी भारताच्या CWG च्या इतिहासात लिहिलं आहे. पण सर्वेशचा प्रवास साधा सोपा कधीच नव्हता.
मक्याचा भुस्सा, जुने कपडे आणि कापूसाची मॅट्रेस
नाशिकचं खेडेगाव अन् गावाकडं साधन संपत्ती कुठून येणार म्हणून प्रशिक्षक जाधव यांनी एक गावठी जुगाड केला. प्रशिक्षक आणि वडिलांचा पाठिंबा असल्याने सर्वेशने उंचच उंच उड्या घेतल्या. त्यांनी सर्वेशच्या वडिलांच्या सहाय्याने मक्याचा भुस्सा, जुने कपडे आणि कापूस यांचा वापर करुन एक जुगाडू उडी मारण्याची गादी तयार केली. तिथं सर्वेश सराव करू लागला. यावेळी त्याने अनेक रेकॉर्ड मोडले. जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय पातळीनंतर सर्वेशने आता कॉमनवेल्थ गेम्समध्ये देशाचं नाव उंचावलं आहे.

Who is Sarvesh Kushare : वडिलांना वाटायचं इंजिनियर व्हावं, पोरानं देशासाठी पटकावलं मेडल; नाशिकच्या पोरानं रचला इतिहास; पहिलाच भारतीय!
वडील शेतकरी.. पोरानं मोठं होऊन इंजिनियर व्हावं
लहानपणापासून सर्वेश कुशारेचा प्रवास संघर्षमय राहिलाय. कोणत्याही सुविधा नसताना सर्वेशने अफलातून कामगिरी करून दाखवलीये. सर्वेशने श्री. डी. आर. भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतलं. त्याचे वडील अनिल कुशारे हे शेतकरी.. पोरानं मोठं होऊन इंजिनियर व्हावं असं त्यांना वाटत होतं. पण सर्वेशने खेळात आपलं करिअर पाहिलं. त्याला उंच उडी प्रकारात मजा येऊ लागली. नाशिक विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत उंच उडीत सर्वेशने तृतीय क्रमांक मिळवल्यावर क्रीडा प्रशिक्षक रावसाहेब जाधव हे त्याच्या कामगिरीने प्रभावित झाले. त्यांनी 2010 पासून सर्वेशकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली.
आयुष्याचा टर्निंग पाईंट
दरम्यान, प्रत्येकाच्या आयुष्यात टर्निंग पाईंट येतो. 2016 मध्ये त्याच्या आयुष्यात टर्निंग पाईंट आला. भारतीय सैन्यदलात दाखल झाल्यावर सर्वेशने पुण्यातील आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट येथे प्रशिक्षक जस्टीन थॉमस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरु केला. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला जलवा दाखवला. डायमंड लीग स्पर्धेत पदक मिळविणारा चौथा भारतीय देखील ठरला. त्यानंतर आता पठ्ठ्यानं सिल्वर मेडल पटकावलं आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर