ब्रेकिंग न्यूज
⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ ज्ञानेश्वर ढोके यांच्या ३२ वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ 6,6,6,4,6,4,6,6… इकडं अभिषेकने ‘गोल्ड’ पटकावलं, तिकडं गुरू Yuvraj Singh चा राडा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 71 धा… ✦ ⚡ नागपूर हळहळलं! भरधाव ट्रेलरने कुटुंबाला चिरडलं, पती-पत्नीसह 4 वर्षीय चिमुकल्याचा जागीच अंत ✦ ⚡ महिलांसाठी महत्त्वाची बातमी, लगेच अर्ज करा आणि शेतकरी प्रमाणपत्र घ्या, सरकारी योजनांचा थेट लाभ ✦ ⚡ गाडी पार्किंगवरून वाद, मध्यस्थी करणाऱ्यालाच संपवलं, मामा-भाच्यासह सहा जणांवर गुन्हा, सोलापुरात खळबळ ✦ ⚡ औंढा नागनाथ मंदिर एक महिना बंद राहणार, भाविकांना 5 ऑक्टोबरपासून दर्शन नाही, कारण… ✦ ⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच…
SP News Maregaon

6,6,6,4,6,4,6,6… इकडं अभिषेकने ‘गोल्ड’ पटकावलं, तिकडं गुरू Yuvraj Singh चा राडा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 71 धा…

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Yuvraj Singh against Australia champions : टीम इंडियाचा वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंग याने आपल्या 44 व्या वयात देखील क्रिकेटचं प्रेम जोपासलं असून त्याने धमाकेदार खेळी करून दाखवली आहे. युवराज सिंहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 161 च्या स्ट्राईक रेटने वादळी खेळी केली अन् टीम इंडियाला विजय मिळून दिला आहे. एकीकडे चेला अभिषेक शर्मा याने पाकिस्तानविरुद्ध धमाकेदार फिफ्टी ठोकली अन् फायनलमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिला. त्यानंतर आता युवराज सिंगने आपल्या जुन्या स्टाईलने सिक्सवर सिक्स ठोकत ऑस्ट्रेलियाला पाणी पाजलं. युवराजच्या शॉट्सच्या त्याच अदा पाहून त्याचे चाहते आजही आनंदी झाले आहेत.
तीन टीम इंडिया काल एकाच दिवशी मैदानात
काल टीम इंडियाच्या एक नाही तर तीन मॅच होत्या. तीन टीम इंडिया काल एकाच दिवशी मैदानात उतरल्या होत्या. एक एशियन गेम्सच्या फायनलमध्ये, दुसरी वेस्ट इंडिदविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात… तर तिसरी टीम वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या स्पर्धेत… या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2026 च्या अगदी पहिल्याच सामन्यात युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार फलंदाजी केली अन् सिंह म्हातारा झाला तरी शिकार करणं विसरत नाही, याची प्रचिती दाखवून दिली.

View this post on Instagram

A post shared by Star Sports India (@starsportsindia)

पाच फोर अन् सहा सिक्स
पहिल्यांदा बॅटिंग करताना युवराज सिंगच्या वादळी खेळीच्या जोरावर इंडियन चॅम्पियन्स संघाने ऑस्ट्रेलियन चॅम्पियन्सविरुद्ध 20 ओव्हरमध्ये 7 गडी गमावून 196 धावा केल्या. पाच फोर अन् सहा सिक्सच्या जोरावर युवीने आपला जलवा पुन्हा एकदा दाखवला. त्याशिवाय युसूफ पठाणने 37 धावांची खेळी केली अन् ऋषी धवनने 12 बॉलमध्ये 35 रन्स केले.
ऑस्ट्रेलियाची टीम 150 वर ऑलआऊट
दरम्यान, भारताने ऑस्ट्रेलियन संघासमोर विजयासाठी 197 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची टीम 150 धावांवर ऑलआऊट झाली. त्यामुळे टीम इंडियाला 46 धावांनी विजय मिळवता आला. टीम इंडियाकडून धवल कुलकर्णी याने चार विकेट्स नावावर केले. तर मोहित शर्माला तीन विकेट्स मिळाले.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर