ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगावच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांचा उपद्रव

168 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पोलीस प्रशासन सज्ज तरी चोरट्यांचा उपद्रव सुरूच

नागरिकांनी पण बाजारात जातांना किंमती वस्तू सांभाळुन ठेवणे गरजेचे

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव येथे दर मंगळवारला आठवडी बाजार भरत असतो.आठवडी बाजारामध्ये तालुक्यामधील 105 गावातील नागरिकांची बाजार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते.त्याचाच गैरफायदा घेऊन हे भुरटे चोर अनेक जणांच्या खिशातून मोबाईल चोरत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहे.

मारेगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे.येथे येथे दर मंगळवारला आठवडी बाजार भरत असतो.त्यासाठी तालुक्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक बाजारासाठी येतात.मारेगाव येथील बाजारात याआधी अनेकांचे मोबाईल चोरी गेल्याच्या घटना घडलेल्या आहे.तशा प्रकारच्या तक्रारीसुद्धा त्यावेळी दाखल करण्यात आल्या होत्या.यावर आळा घालण्याच्या दृष्टीने पोलीस कर्मचारी बाजारात टेहळणी करीत असतात.

तरीही चोरटे अनेकांच्या खिशातून मोबाईल उडवण्याच्या घटना गेल्या अनेक दिवसापासून घडत आहे.अनेकांनी आपले मोबाईल खिशातून चोरी गेल्याच्या मारेगाव पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या आहे. हे भुरटे चोर गर्दीचा गैरफायदा घेऊन अनेकांच्या खिशातून मोबाईल चोरत आहे.आज पर्यंत बरेच जणांचे मोबाईल गेल्याची खमंग चर्चा आहे.त्यापैकी काही जणांनी कमी किमतीचे मोबाईल असल्याने पोलीस स्टेशनला तक्रार दिली नसल्याची माहिती आहे.पण ज्याचे मोबाईल महागडे आहे त्यांनी तक्रारी दाखल केली आहे.तसेच नागरिकांनी बाजारात जातांना किंमती वस्तू सांभाळुन ठेवणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया…
पोलीस प्रशासन या भुरक्याचोरट्यांच्या मार्गावर असून हे भुरटे चोर लवकरच गजाआड करण्यात येईल असे आश्वासन मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ यांनी दिले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर