ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

1.3k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

संशयित आरोपीविरोधात मारेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील एका गावात काकूच्या सोबत तिच्या माहेरी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली. सदर घटनेची तक्रार मुलीच्या काकाने मारेगाव पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे.

तक्रारदार हे मारेगाव तालुक्यातील एका गावातील राहिवासी आहे. ते कामानिमित्त सध्या पुणे येथे राहत आहे.त्यांच्यासोबत त्यांची पुतणी ही सुद्धा राहून तेथे शिक्षण घेत होती.तक्रारदार व्यक्तीची पत्नी गरोदर असल्याने त्यांनी तीला तिच्या माहेरी आणून सोडले होते. सोबतच पुतणीचीही परीक्षा संपल्याने तीही काकूला मदत म्हणून काकूच्या माहेरी आलेली होती.

पत्नीचा दवाखाना करायचा असल्यामुळे मुलीचे काकासुद्धा हे गावाला आले होते. ते दि.23 एप्रिलला पती – पत्नी आणि सासूला घेऊन वणीला दवाखान्यात गेले.पुतणी आणि सासरे हे घरीच थांबलेले होते. सायंकाळी 5 वाजता दवाखाना आटोपून घरी परतले तेव्हा त्यांना पुतणी वय 16 वर्षे 8 महिने 14 दिवस अशी घरी आढळून आली नाही. त्यांनी तीला सर्वत्र शोधले असता तिचा शोध लागला नाही.

शेवटी गावातीलच एका महिलेने तुमची पुतणी ही गावातीलच एका तरुणाच्या गाडीवर बसून गेली असे सांगितले. यावरून अल्पवयीन मुलीच्या काकाने संशयित आरोपी विरोधात मारेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.अखेर अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्य कलम 137 (2) नुसार गुन्हा दाखल केला.सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर