ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अवघ्या काही तासात बकऱ्या चोर पोलिसांच्या ताब्यात.

71 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

एका दिवसातच लावला चोरीचा छळा.

मारेगांव पोलिसांची धडाकेबाज कारवाई.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव येथे ऐन मध्यवस्तीतून रात्रीच्या सुमारास तीन बकऱ्या चोरी गेल्या होत्या.बकऱ्या चोरून एक दिवसाचाही कालावधी उलटून जात नाही तोच मारेगाव पोलिसांनी या चोरट्यांना जेरबंद केले आहे.

सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव येथील प्रभाग क्र.3 मधील राहिवासी संजय कवडुजी तुरारे वय 38 वर्ष यांच्या बकऱ्या घराच्या बाजुच्या टिनाच्या शेड मधून मंगळवार दिनांक 31जानेवारीच्या पाहाटे 3:30 वाजताच्या सुमारास कार मध्ये बकऱ्या चोरी करून नेत असल्याचे शेजाऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी लगेच ही महिती संजय यांना दिली.

त्यांनी शेड मध्ये जाऊन बगले असता तीन बकऱ्या चोरी गेल्या होत्या.जाची किंमत सुमारे 25 हजार आहे.त्यांनी लगेच या घटनेची तक्रार मारेगाव पोलीस स्टेशन येथे देण्यात आली होती. या घटने नंतर मारेगाव पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवीत सगळीकडे फोन करीत शोधाशोध सुरु केली.

अशातच यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेने मारेगाव येथे माहिती दिली की बकऱ्या, दोन आरोपी आणि एक मारोती 800 कार लाल रंगाची MH 34 C 8501 हे चारचाकी वाहन असा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती वरून मारेगाव पोलिसांनी शेळीमालक संजय तुरारे यांना सोबत घेऊन यवतमाळ गाठले.तिथे असलेल्या बकऱ्या पाहुण ह्याच आमच्या बकऱ्या आहेत असे त्यांनी ओळखले.

सोबतच बकऱ्या चोरणारे दोन आरोपी रिच रामदास कोटकर वय 18 वर्ष मंगलम पार्क वणी,सुजल अजय मोरे वय 18 वर्ष साधणकरवाडी वणी,व एक विधी संघर्ष बालक यांना दुसऱ्या दिवसाला दुपारी अटक केली.सुमारे 80 हजाराच्या मुद्देमाल सह तीन आरोपींना मारेगाव ठाण्यात गजाआड केले आहे.

अवघ्या 24 तासांच्या आत चोरीच्या घटनेचा सुगावा लागल्याने मारेगांव पोलिसांचे कौतुक होत आहे.त्यांचेवर कलम 379,34 अन्वये गुन्हा दाखल असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार,ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार आनंद अलचेवार,संजय वारेकर,अफजल पठाण,राजू टेकाम पुढील तपास करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर