ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

मार्डी येथे धाडसी चोरी,तीन दुकाने फोडली

118 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

चोरीत वापरलेली कार करंजीत

सुरेश पाचभाई मारेगाव

मार्डी येथील मुख्य लाईनमध्ये असलेली तीन दुकाने फोडून अज्ञात चोरट्यानी हात साफ केल्याची घटना दिनांक 20 जुलै 2024 च्या पहाटेच्या सुमारास घडली आहे.

मागील वर्षी मारेगाव शहरात एकाच रात्री अनेक घरी चोरी झाल्याची घटना ताजी असतांनाच तशाच प्रकारचा प्रयत्न आज मार्डीमध्ये घडला.मार्डी मुख्य बाजारलाईन मध्ये असलेले गौरव अनंतवार यांचे वैष्णवी ज्वेलर्स, हरीश नागपुरे यांचे गुरुदेव मेडिकल स्टोअर्स,मनोहर ठाकरे यांचे साई किराणा या दुकानांना फोडून गुरुदेव मेडिकल स्टोअर्स मधुन 14 हजार रुपये रोख लंपास केले हा सगळा प्रकार दि.२० जुलैला पहाटेच्या सुमारास घडला.

पांढऱ्या रंगाची इंडिगो वाहनामधून खाली उतरत चेहऱ्याला कपडा बांधलेले चार जण रस्त्यावरून फिरताना तर एक जण पांढऱ्या रंगाची कार चालवत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले.यावरून चोरटे पाच जण असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.हरीश नागपुरे यांच्या गुरुदेव मेडिकलमध्ये असलेला सिसिटीव्ही कॅमेराचा डीवीआर चोरट्याकडून फोडण्यात आला.मात्र चोरट्याच्या हाती फारसे काही लागले नसले तरी या घटनेने व्यापारी व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.

या घटनेची पोलीस विभागाने दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ,पी एस आय डी.जी.सावंत, ए एस आय भालचंद्र मांडवकर, रजनीकांत पाटील, अजय वाभीटकर, प्रमोद जिद्देवार, विजय वानखडे अधिक तपास करून चोरट्याचा शोध घेत आहे.

चोरीत वापरलेली कार करंजीत
मार्डी येथील चोरीच्या घटनेमध्ये वापरलेली पांढऱ्या रंगाची कार बुलढाणा जिल्हातील मेहकर येथील चोरीची असल्याचे कळते. चोरीतील कार करंजीमध्ये उड्डाणपुलाखाली बेवारस अवस्थेत आढळून आली तर चोरट्यानी करंजी येथील बोलेरो पिकप गाडी चोरून पलायन केल्याचे समजते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर