ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

23 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

2.3k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

जळका शेतशिवारातील घटना

सततच्या आत्महत्येने तालुका हादरला

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यात होत असलेल्या सततच्या आत्महतेमुळे संपुर्ण तालुका हादरला आहे. प्रशासनाकडून आत्महत्या रोखण्यासाठी कुठलीच ठोस उपाययोजना केली जात नाही.

जळका येथील स्वतःच्या शेतात असलेल्या रोहिणीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रितम हुसेन आत्राम वय अंदाजे 23 वर्ष असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

प्रितम हा वडिलांना शेती कामात मदत करायचा तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता.अशातच काल दिनांक 17 मे 2025 रोज शनिवारला दुपारी 12: 30 वाजता बाहेर जाऊन येतो असे सांगुन तो घरून निघून गेला.

बराच वेळ झाला तरी तो घरी परत न आल्याने घरच्या मंडळींनी त्याची सगळीकडे शोधाशोध केली. पण तो कुठेही दिसून न आल्याने शेवटी सायंकाळी 5 वाजता कुटुंबातील काही सदस्यांनी शेतात जाऊन बघितले असता शेतात असलेल्या रोहिणीच्या झाडाला प्रीतम गळफास घेऊन लटकलेला अवस्थेत दिसला.

प्रितमने गळफास घेतल्याची माहिती कुटुंबियांनी जळका येथील पोलीस पाटलांना दिली.त्यांनी लगेच मारेगाव पोलीस स्टेशनला फोन करून सदर घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.व मृतदेहाचा घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

प्रितमच्या पश्चात आई,वडील,एक भाऊ असा आप्त परिवार आहे. सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे मार्गदर्शनाखाली जमादार दिगंबर किनाके करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर