ब्रेकिंग न्यूज
⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट ✦ ⚡ Nana Patekar Death : तब्बल 45 मिनिटं सुरू होते नाना पाटेकरांना वाचवण्याचे प्रयत्न, पहाटे 5:20 ला काय घडलं? …
SP News Maregaon

CRIME : आई अचानक गायब, पोलिसात तक्रार! 1967 किमीचा प्रवास अन् ‘तमिलनाडू एक्सप्रेस’मध्ये धड नसलेली बॉडी, CCT…

11 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Tamil Nadu Express Murder Red suitcase CCTV : अंदाजे सकाळचे 5 वाजले असतील. पॅसेनजर्स आरामात झोपले होते. त्याचवेळी काही पॅसेन्जर्सला जाग आली. डब्यात घाणेरडा कुमट वास सुटला होता. सगळ्यांची झोपमोड झाल्यानंतर त्यांना एक लाल सुटकेस दिसली. त्यातून हा वास येत होता. काहींनी जवळून पाहिलं तर त्यातून पाणी खाली पडत होतं. पोलिसांना बोलवण्यात आलं अन् सुरू झाली थ्रिलर मर्डर मिस्ट्रीची इन्वेस्टिगेशन…!
महिलेचे धड नसलेली बॉडी सापडली
चेन्नई-नवी दिल्ली तमिळनाडू एक्स्प्रेसमध्ये सापडलेल्या लाल रंगाच्या ट्रॉली बॅगेतील मृतदेहाचा उलगडा करत आग्रा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. 5 ऑगस्ट रोजी आग्रा कॅन्टोन्मेंट स्टेशनवर गाडी पोहोचल्यानंतर एका पिशवीतून दुर्गंधी आणि द्रव येत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आलं. प्रवाशांनी तात्काळ रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली आणि पोलिसांनी बॅग उघडून पाहिली असता त्यात एका महिलेचे धड नसलेली बॉडी सापडली. बॉडी पाहिल्यानंतर पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली.

Chengalpattu, Tamil Nadu: A major twist has emerged in the Tamil Nadu Express suitcase murder case after Guduvanchery Police reportedly recovered a woman’s head and other body parts from a house. Police suspect a 26-year-old man and his girlfriend killed the 45-year-old woman and… pic.twitter.com/afY6yI2ZBM
— IANS (@ians_india) August 23, 2026

चेन्नई सेंट्रल स्टेशनवरचं CCTV फुटेज
या घटनेचा तपास करताना पोलिसांनी चेन्नई सेंट्रल स्टेशनचे CCTV फुटेज तपासलं, ज्यामध्ये एक तरुण आणि महिला तीच लाल ट्रॉली बॅग ट्रेनमध्ये ठेवताना स्पष्टपणे दिसले. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढत थेट गुडुवंचेरी येथील मॉस्क स्ट्रीटवरील एका भाड्याच्या घरापर्यंत पोहोचले. शुक्रवारी पोलिसांनी या घरात छापा मारून पाहणी केली असता एका मोठ्या भाड्याच्या घरातून त्याच बॉडीचे आणखी काही तुकडे पोलिसांना सापडले अन् इथून सुरू झाला तपास…!
माणिक लष्कर याच्याशी प्रेमसंबंध
पोलिसांनी महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान या 38 वर्षीय मृत महिलेची ओळख ओडिशा येथील रहिवासी हयाथुन निशा अशी पटली आहे. पण महिला कामानिमित्त त्या गुडुवंचेरी येथे एका खासगी कंपनीत काम करत होत्या. निशा यांचे आसामचा रहिवासी माणिक लष्कर याच्याशी प्रेमसंबंध होते, अशी माहिती तपासातून समोर आली. या संबंधांना निशा यांच्या मुलाचा तीव्र विरोध होता, ज्यामुळे वाद होऊन तो आईपासून वेगळा राहत होता.

ODISHA COUPLE SUSPECTED IN WOMAN’S MURDER
WHOSE BODY PARTS DUMPED INSIDE A SUITCASE
RECOVERED BY RAILWAY POLICE AT AGRA CANTONEMENT RAILWAY STATION
Three special teams were formed to trace a couple from Odisha who were wanted in connection with the murder of a woman whose… pic.twitter.com/eU3qQ6ufVU

— A Selvaraj (@Crime_Selvaraj) August 22, 2026

आई अचानक गायब, मुलाने पोलिसात तक्रार दिली
आई अचानक गायब झाल्याने मुलाने गुडुवंचेरी पोलिसांत ती हरवल्याची तक्रार नोंदवली होती आणि त्यानंतरच या धक्कादायक हत्याकांडाचा खुलासा झाला. पोलिसांनी 35 ते 40 वयोगटातील मिसिंग महिलेचा घेतला होता. तिथून महिलेचा ओळख पटली होती. घरातून मिळालेले अवशेष आणि आग्र्यात सापडलेले अवशेष एकाच महिलेचे आहेत का, हे निश्चित करण्यासाठी ते फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
मुख्य संशयित घटनेनंतर फरार
पोलीस सध्या माणिक उद्दीन लष्कर आणि त्याची साथीदार ओडिशाची भगवती माझी यांचा शोध घेत आहेत. हे दोघंही या हत्येत मुख्य संशयित असून घटनेनंतर फरार झाले आहेत. गुडुवंचेरी येथील याच घरात निशा या दांपत्यासोबत राहत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून मुख्य संशयितांचा शोध वेगाने सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर