ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

मारहानी मुळे अपमान झाल्याने 55 वर्षीय विवाहिताची कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या.

83 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

उसने दिलेले पैसे वापस मागितल्या मुळे मारहाण, त्या नंतर कीटकनाशक प्राशन.

मारेगाव तालुक्यातील टाकरखेळा येथील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

नानाजी देवराव धानकी असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. टाकरखेळा येथे उसने दिलेले 50 हजार रुपये परत मागण्यासाठी गेलेल्या सुमारे 55 वर्षीय नानाजी देवराव धानकी यांना मारहाण करण्यात आली होती. त्या घडलेल्या प्रकारामुळे निराश झालेले नानाजी धानकी यांनी 22 मे 2022 रोजी  कीटकनाशक प्राशन केले व आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्या मुळे त्यांना तातडीन मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

त्यांच्यावर प्रथम उपचार करून पुढिल उपचारासाठी वणी येथे सुगम हास्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नानाजी देवराव धानकी यांच्यावर 13 दिवसांपासून वणी येथे उपचार सुरू असताना काल उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटणा समोर आली.नानाजी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी मयतच्या पत्नी सुभद्रा नानाजी धानकी,यांनी मारेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन या गंभीर घटनेची दखल घेत पोलिसांनी काही वेळातच संशीयत 4 आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संदर्भात कलम 306 (34) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

22 मे 2022 रोजी ही घटना घडली होती. विलास धानकी व इतर तिघांनी नानाजी देवराव धानकी यांना मारहाण केली आणि जिवानिशी मारण्याची धमकीही दिली होती. ही घटना मारेगाव तालुक्यातील टाकळखेळा तेथे घडली.त्यांना झालेल्या मारहाणीमुळे निराश होऊन नानाजी यांनी अखेर कीटकनाशक प्राशन केले 13 दिवसांपासून वणी येथे उपचार सुरू असताना काल 5 जुन रोजी रविवारला अखेरचा श्वास घेतला. नानाजी हे शेतकरी आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.यांच्या मागे पत्नी, आहे .या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर