ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

21 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

2.2k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नवरगाव(धरण) येथील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील नवरगाव (धरण) येथील 21 वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोज शनिवारला सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

खुशबू सुभाष मोहुर्ले रा.नवरगाव (धरण) असे स्वतःच्या घरात गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.खुशबू ही वणी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती.व ती वणी येथे किरायाने रुम करून राहत होती.तिच्या क्लासेसला दोन दिवस सुट्टी असल्यामुळे ती स्वगावी नवरगाव येथे आली होती.तिची आई नेहमीप्रमाणे सकाळी गावातीलच एका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कामासाठी गेली होती.

सायंकाळी शेतातून कामावरून आई घरी परतली तेव्हा दरवाजा टेकवून होता.आईने दरवाजा उघडून बघितले असता घरातील मधल्या खोलीमध्ये मुलगी स्कार्फच्या (दुप्पटा) सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.आईने आरडाओरड केली असता गावातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले.व तरुणीला लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पण तेथील डॉक्टरांनी खुशबू हिला तपासून मृत घोषीत केले.

मृतक खुशबूच्या पश्चात आई व विवाहित दोन बहिणी असून तिच्या वडिलांचे निधन झाले आहे.खुशबूच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे मार्गदर्शनाखाली जमादार दिगांबर किणाके करित आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर