ब्रेकिंग न्यूज
⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ ज्ञानेश्वर ढोके यांच्या ३२ वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ 6,6,6,4,6,4,6,6… इकडं अभिषेकने ‘गोल्ड’ पटकावलं, तिकडं गुरू Yuvraj Singh चा राडा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 71 धा…
SP News Maregaon

अवघ्या 5 वर्षांची चिमुकली, स्वातंत्र्यदिन कार्यक्रमावरून घरी आली, रिक्षावाल्यानं चॉकलेट दिलं अन्… भयंकर क…

9 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर: शाळेतील स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आटोपून पाच वर्षांची चिमुकली घरी परतली. तेव्हा एका रिक्षाचालकांनं तिला गाठलं आणि परिसरात ती एकटीच असल्याचं हेरून चॉकलेट देण्याचं आमिष दाखवत आक्षेपार्ह लैंगिक गैरकृत्य केलं. छत्रपती संभाजीनगरातून ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित पालिकेच्या आईनं थेड सातारा पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि आरोपी रिक्षाचालक दत्तात्रेय अप्पाराव मोकासे (वय 47, रा. कांचनवाडी) याला अटक केली.

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकली तिच्या आई-वडिलांसह सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. ती बालवाडीत जात असून तिची आई रोज तिला वर्गात सोडून परत आणत होती. 15 ऑगस्ट रोजी दुपारी ही चिमुकली शाळेत झेंडावंदन करून घरी परतली. तेव्हा परिसरात एकटीच होती. तेव्हा रिक्षाचालक आरोपी दत्तात्रेय मोकासे याने तिला जवळ बोलावून विश्वासात घेतलं. तसेच दुकानावरून चॉकलेट घेऊन देण्याचं आमिष दाखवलं. त्यानंतर तिला निर्मनुष्य परिसरात नेत तिच्यासोबत आक्षेपार्ह लैंगिक कृत्य केलं.

प्रसिद्ध युट्युबरची अकाली एक्झिट, मृत्यूनंतर दोघांना जीवनदान, ‘ती’ कृती पाहून सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी, छ. संभाजीनगरात काय घडलं?

दरम्यान, मुलगी घरी परतली तेव्हा घाबरलेली होती. तिची अवस्था बघून आई आणि कुटुंबातील सदस्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा काही वेळाने तिच्यासोबत घडलेला संतापजनक प्राकर सांगितला.

आईची पोलिसांत धाव

घडलेल्या प्रकारानंतर चिमुकलीची प्रकृती बिघडली. तिच्यावर उपचार करून आईने कुटुंबासोबत थेट पोलीस स्टेशन गाठले. घटनेचं गांभीर्य लक्षात घत पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला. तसेच मुलीने सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला.

दरम्यान, मंगळवारी मोकासे हा पैठण रोड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक निर्मला राख यांनी तत्काळ शोध घेऊन नराधम मोकासेच्या मुसक्या आवळल्या. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मोकासे विवाहित असून त्याला मुलं शाळेत शिकत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर