बातमी ऐका (Marathi Voice Reader)
Pune London Mugdha Deshmukh Crime News : शिकण्यासाठी लंडनला गेलेली पोरगी पुण्यात अचानक आली कशी अन् तिची बॉडी एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये सापडली कशी? असा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे. मुग्धा देशमुख हिचा पिंपरी चिंचवडमधील फ्लॅटमध्ये संशयास्पद मृतदेह सापडल्यानंतर आता पोलिसांनी कसून चौकशी आणि तपास सुरू केला असताना आता मुग्धाच्या वडिलांनी केलेली मिसिंग तक्रार समोर आली आहे. या तक्रारीनुसार, 8 ऑक्टोबर ते दिंनाक 25 ऑक्टोबर दरम्यान मुग्धाने काही पेमेंट केले होते. त्यावरून मुग्धा संभाजीनगरमध्ये आली होती का? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. नेमकं प्रकरण काय? पाहा…
मुग्धाच्या वडिलांनी तक्रार देताना काय म्हटलं?
आम्हाला मुग्धाचे वास्तव्य लंडनमध्ये असणे अपेक्षित होते. त्यामुळे आम्ही तेथील प्रशासनाकडे तक्रार केली भारतीय उच्च आयुक्तांकडे ही तक्रार नोंद केली. परंतू त्यांचं काही उत्तर आलं नाही, असं मुग्धाच्या वडिलांनी मिसिंग कंप्लेन्टमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर मी तिचं HDFC बँक खाते क्रमांक 5*******3 चा उतारा काढला असता, तीचे वरील खात्यावरुन Zomato, Blinkit, swiggy, book my show, make my trip, VFS ग्लोबल सर्व्हिस ईत्यादी वर क्रेडीट कार्डव्दारे UPI व्दारे पेमेंट झाली आहे, असं मुग्धाच्या वडिलांनी सांगितलं.
Pune Mugdha Deshmukh Case : लंडनवरून गुपचूप पुण्यात, आई-वडिलांपासून ‘लपवाछपवी’ अन् उच्चभ्रू सोसायटी संशयास्पद मृत्यू, वाचा A टू Z स्टोरी!
काही दिवसांपूर्वी मुग्धा उस्मानपुरा होती?
मुग्धा वापरत असलेला पेंमेंट व्यवस्था भारतातच आहे. त्यातील एक Blinkit ऑर्डर ही उस्मानपुरा भागातील असण्याची शक्यता आहे. त्यावरुन आमची खात्री झाली की, ती भारतातच आहे, असं मुग्धाच्या वडिलांनी तक्रार देताना म्हटलं आहे. त्यामुळे मुग्धा उस्मानपुरा होती का? किंवा उस्मानपुरात तिने कुणाला डिलिव्हरी दिली? असे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. मुग्धा हिचे फक्त संभाजीनगर इथंच राहते घर आहे. वरील सर्व व्यवहार हे दिंनाक 08 ऑक्टोबर ते दिंनाक 25 ऑक्टोबर दरम्यान झालेले आहेत.
Pune Mugdha Deshmukh Case : मुग्धा देशमुख प्रकरणात पोलिसांना घातपाताचा संशय? शरीरावर इजा नाहीत मग ‘व्हिसेरा’ का राखून ठेवला?
मुग्धाच्या वागणुकीवर संशय
मुग्धाची पहिल्याची वागणूक आणि आत्ताची वागणूक ही पुर्णपणे विंसगत आहे, असा संशय देखील तिच्या वडिलांनी व्यक्त केला होता. त्याचबरोबर मुग्धाच्या जीवाला धोका असण्याची शक्यता देखील तिच्या वडिलांनी मिसिंग तक्रार देताना व्यक्त केली होती. त्यामुळे आता या प्रकरणात पोलिसांनी देखील कसून तपास सुरू केला असून येत्या काळात महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.