ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कोणी नाही कुणाचे शेवटी अंती जाणे रे ऐकल्याचे !!!!!!

83 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

गेल्या 2 वर्षात मारेगाव तालुक्यात 106 आत्महत्या.

त्यामधून 26 मदतीस पात्र 59 शेतकऱ्यांनी संपवली आपली जिवन यात्रा…

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की..
मारेगाव तालुक्यातील गेल्या दोन वर्षांपासून सतत पंधरवाड्याला ,महिन्याला विविध कारणाने आत्महत्येचे प्रकरण समोर येत आहे. सन 2020 या वर्षी पासून तर 2022 या चालू वर्षा सुमारे 106 तालुक्यात आत्महत्या झाल्या आहे. यात 59 शेतकरी आत्महत्या आहेत यातील फक्त 26 आत्महत्या पात्र ठरले आहे.
जागतिक कोरोणानाच्या महामारीमुळे रोजगार, शेती, व्यवसाय, शासकीय कामकाज, शिक्षण प्रभावित झाले होते.
आजही जनमानसात कोरोनाची भिती कायम असल्याचे वास्तव आहे. तालुक्यात मागील 2 वर्षात कदाचित नैराश्यातून आत्महत्या केल्याने अनेकांना आपले प्राण गमवले आहे सातत्याने होणाऱ्या या आत्महत्येने समाजमन सुन्न होत असून मारेगाव तालुका आता आत्महत्याग्रस्त तालुका म्हणुन नावारूपाला येत आहे. आत्महत्येचे कालचक्र कधी संपणार ? असा प्रश्न जनतेला पडत आहे. सातत्याने होणाऱ्या आत्महत्यामुळे
समाजमन सुन्न झाले आहे नैराश्यातून आत्महतेकडे प्रामुख्याने तरुण पिढी ओढल्या जात आहे समाजातील नागरिकांचे नैराश्य दुर करण्यासाठी शासन लाखो रुपये खर्च करून जनजागृती करीत आहे. परंतू जन जागृतीचा काहीच परीणाम होत नसल्याचे चित्र आहे.

मागील 2 वर्षाच्या काळात 106 आत्महत्या झालेल्या आहे. आत्महत्येचे हेत सत्र 2022 मध्ये पण सुरूच आहे. मागील 2 महिन्यात विविध कारणाने 8 लोकांनी हत्महत्या केल्या आहे. यात सन 2020 मध्ये 46 व 2021 मध्ये 52 आणी चालू वर्षात जानेवारी मध्ये 2 व फेब्रुवारी मध्ये 5 मार्च महिन्याच्या सुरुवातीला 1 आत्महत्या झाली आहे. मारेगांव तालुक्यात वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे समाजमन चिंतीत झाले आहे. या तालुक्यात केवळ शेतकरीच नाही तर बेरोजगार तरुणही निराशेच्या गर्तेत सापडले असून जिवन यात्रा संपवित आहे. या तालुक्यात रोजगाराची सुविधा नसणे हे देखील आत्महत्येचे एक कारण ठरत असल्याचेच जनतेतून बोलल्या जात आहे.

[ ] मागिल 2 वर्षाच्या काळात आत्महत्येचा 100 आकडा पार झाला आहे. यातील 2 फेर चौकशीत आहे 2 वर्षात एकूण 59 आत्महत्या झाल्या असल्या तरी दोन वर्षात केवळ 26 शेतकरी मदतीस पात्र ठरले आहे उर्वरित आत्महत्या लाभास अपात्र ठरल्याने या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शासनाचा कोणताही लाभ मिळाला नाही. उध्ववस्त झालेले संसार नव्याने थाटण्यासाठी सरकारी स्तरावर उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे अशी तालुक्यातील जनतेचे आर्त हाक आहे…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर