ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

खैरगाव (भेदी) येथे चण्याच्या गंजीला आग.

86 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

उधारीचे पैसे न दिल्याने कृत्य केल्याचा संशय.

गजानन आसुटकर मारेगांव:-तालुक्यातील खैरगाव येथे एका शेतकऱ्याचा शेतातील प्रवासाचे उर्वरित भाडे न दिल्याच्या रागातून एका व्यक्तीने चण्याच्या गंजिला आग लावल्याची घटना तालुक्यातील खैरगांव (भेदी) येथे घडली.या आगीत शेतकऱ्याच्या शेतातील चणा जळून खाक झाला असून यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सविस्तर वृत्त असे की…
वाघदरा येथील शेतकरी योगेश नीळकंठ तावाडे यांची खैरगाव (भेदी) येथे 7 एकर शेती आहे.त्यांनी या वर्षी शेतामध्ये 5 एकर मध्ये चण्याची पेरणी केली होती.ऊर्वरीत 2 एकर शेतात गहु या पिकांची लागवड केली होती.सध्या परीसरात चना व गहु पिकाच्या कापणीला सुरूवात झाली आहे.त्या मुळे योगेश यांनी सुद्धा आपल्या शेतातील चना पिकांची कापणी सुरू केली व शेतात गंजी लावुन ठेवली होती.

काल दिनांक 19 मार्च 2023 रोज रविवारला सकाळी काही शेतकरी शेताकडे गेले असता त्यांना योगेश यांचे शेतात काही तरी जळत असल्याचे निदर्शनास आले.त्यांनी लगेच शेतात जाऊन बघीतले असता शेतातील चण्याचा ढीग जळत असल्याचे निदर्शनास आले.या शेतकऱ्यांनी तात्काळ शेतमालकांना या घटने संदर्भात माहिती दिली.त्या मुळे ही घटना उघडकीस आली असुन आगीत शेतकऱ्यांचे सुमारे 20 ते 25 किंटलचे नुकसान झाले आहे.या संदर्भात शेतकऱ्याने लगेच मारेगांव येथील पोलीस ठाणे गाठत एका व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली.

यात त्यांनी वाघदरा येथील संशयित आरोपी संतोष नत्थू भोयर यांनी गाडीचे भाड्याचे पैसे दिले नाही तर मला वसुल करता येते अशी धमकी दिली होती त्यामुळे त्यानेच हा चण्याचा ढीग पेटवला असावा अशा प्रकारची तक्रार दाखल केली.असुन संशयित आरोपी वर कलम 435 भा.द.वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गर्शनाखाली जमादार चांदेकर करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर