बातमी ऐका (Marathi Voice Reader)
Babar Azam Statement : इंग्लंडविरुद्ध झालेल्या सलग दोन कसोटी सामन्यांत पराभव झाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टीममधील तब्बल सात खेळाडूंना वगळलं अन् त्यांना पाकिस्तानमध्ये परत बोलवण्यात आलं होतं. तर मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांनाही पदावरून हटवण्यात आलं आहे. त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेटमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. अशातच आता पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम याने आणखी एक बॉम्ब फोडला असून पीसीबीचं वास्तव आता जगासमोर येताना दिसतंय.
माझ्यासाठी ही न्यूजच होती…
पाकिस्तानचा सध्याचा कॅप्टन बाबर आझम याने नवा बॉम्ब फोडला आहे. इंग्लंड दौऱ्यादरम्यान मोहम्मद रिझवान आणि सलमान आगा यांच्यासह सात खेळाडूंना संघातून वगळण्याच्या निर्णयात माझा कोणताही सहभाग नव्हता, असं बाबर आझम म्हणाला आहे.एडजबॅस्टन कसोटीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बाबर आझम म्हणाला की, माझ्यासाठी ही न्यूजच होती, जशी तुमच्यासाठी होती, असंही बाबर आझम म्हणाला.
निर्णयात माझा सहभाग नव्हता – बाबर
मलाही सगळ्या गोष्टी नंतरच कळाल्या. हा निर्णय पीसीबीने घेतला आहे, त्यामुळे तेच तुम्हाला सगळं समजवू शकतील, असंही बाबर आझम म्हणाला. परिस्थितीला सामोरं जाणं किती कठीण होतं? असा सवाल विचारला गेला तेव्हा बाबर आझमने एका वाक्यात उत्तर देणं पसंत केलं. कठीण नाही, पण आश्चर्यकारक होतं, असंही बाबर आझम यावेळी म्हणाला. तसेच निर्णयात माझा सहभाग नव्हता, असंही बाबर आझम म्हणालाय.
तपासाची काहीही माहिती नव्हती – बाबर
दरम्यान, पाकिस्तानमधील वृत्तांनुसार, पीसीबी अधिकाऱ्यांनी दोन्ही खेळाडूंचे फोन जप्त केले. लंडनमधील त्यांच्या संपर्कांची पडताळणी करण्यासाठी त्यांचा डेटा हस्तांतरित करण्यात आला. यानंतर, दोन्ही खेळाडूंना पाकिस्तानात परत येण्यास सांगण्यात आले. बाबर म्हणाला की त्याला तपासाची काहीही माहिती नव्हती.