ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


India Vs Sri Lanka Test Series : साई सुदर्शन दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर सरफराज खानचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे. तरीही, 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी मॅचसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये सरफराजला संधी मिळण्याची शक्यता दिसत नाहीये. सरफराजऐवजी ध्रुव जुरेलला संधी मिळण्याची शक्यता जास्त असल्याचं भारताचा माजी स्पिनर रविचंद्रन अश्विनने म्हटलं आहे. 28 वर्षीय सरफराज 2024 मधील न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी मॅचच्या मालिकेनंतर भारतीय संघाकडून खेळलेला नाही.
सरफराज खानला क्लियारिटी द्या…
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत सरफराजने 150 धावांची दमदार इनिंग खेळली होती, पण नंतरच्या दोन मॅचेसमध्ये त्याला ही कामगिरी पुन्हा करता आली नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही आणि पुढे थेट संघातूनच वगळण्यात आलं. याच मुद्द्यावर बोट ठेवत आर आश्विन याने गौतम गंभीरला झापलं आहे. सरफराज खानला क्लियारिटी देण्यात यावी, असं आर आश्विन याने म्हटलं आहे.
सरफराजबद्दल काही शंका असतील, तर…
अश्विनने म्हटलं की, जर भारतीय संघाच्या योजनेत सरफराजच्या स्थानाबद्दल काही शंका असतील, तर संघ व्यवस्थापनाने त्याला स्पष्ट कल्पना दिली पाहिजे. कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य कोच गौतम गंभीर यांनी सरफराजच्या भवितव्याबाबत त्याला अनिश्चिततेत न ठेवता त्याच्या भूमिकेबद्दल स्पष्ट बोलले पाहिजे. ‘अॅश की बात’ या युट्यूब चॅनेलवर बोलताना आश्विनने असं वक्तव्य केलंय.
आश्विन म्हणतो…
मी जुरेलपासून सुरुवात करेन. साई सुदर्शनच्या दुखापतीमुळे सरफराजचा संघात समावेश झाला आहे. सरफराजला योग्य संदेश देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला विशिष्ट परिस्थितीत तो कमकुवत वाटत असेल, तर त्याला स्पष्ट सांगा. आशियाई परिस्थितीत तो संघासाठी उपयुक्त ठरू शकतो, हे त्याला स्पष्टपणे समजवलं पाहिजे, असंही आश्विन म्हणाला.
सरफराजला क्लियारिटी दिली तर…
सरफराजला क्लियारिटी दिली तर तो इतर गोष्टींवर आपला वेळ वाया घालवणार नाही. तो चांगल्या स्पिन बॉलिंगचा सामना करण्यावर लक्ष केंद्रित करू शकेल आणि आशियामध्ये परिस्थितीचा राजा बनू शकेल. तो आपले करिअर घडवू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की तो काही विशिष्ट परिस्थितीत उपयुक्त ठरू शकत नाही, तर ते त्याच्याशी स्पष्टपणे बोला, असं आश्विन म्हणाला आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर