ब्रेकिंग न्यूज
Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु… बाबापुरच्या गणरायाच्या दर्शनासाठी भक्तीचा ओघ वाढतोय! Nigar Sultana : हरमनप्रीतशी पंगा पडला भारी! बांगलादेशच्या कॅप्टनची तातडीने हकालपट्टी, सेमीफायनलमध्ये काय घड… गृहिणी बनली उद्योजिका, 700 कोंबड्यांपासून सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला 3 लाखांची उलाढाल, Video
SP News Maregaon

Ajinkya Rahane Wife : एअरपोर्टवर राधिकाला म्हणाला ‘मी शेवटचं खेळतोय…’, अजिंक्य रहाणेच्या पत्नीची डोळ्यात …

13 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Ajinkya Rahane Retirement Wife Emotional Post : टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि महाराष्ट्राचा लाडका अज्जू म्हणजेच अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तसेच तो आता आयपीएल देखील खेळणार नाही. अजिंक्य रहाणे याने व्हिडीओ शेअर करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्यावेळी त्याला अश्रू अनावर झाले होते. अशातच आता अजिंक्य रहाणे याच्या पत्नीने भावुक करणारी पोस्ट लिहिली आहे. तिने यावेळी आयपीएलच्या शेवटच्या हंगामाचा किस्सा देखील सांगितला.
काय म्हणाली राधिका?
मागील आयपीएल हंगामासाठी विमानतळावर निघताना, लिफ्टमध्ये शिरण्यापूर्वी तू म्हणालास, "चलो राड्स, शेवटच्या हंगामासाठी निघालोय. हे मी आता शेवटच्या वेळी खेळणार आहे." मला आठवतंय, मी तिथंच उभी होते आणि काय बोलावं किंवा कशी प्रतिक्रिया द्यावी हेच मला सुचत नव्हतं. त्या क्षणी आठवणींचा पूर आला… तुझा संपूर्ण प्रवास माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेला, असं अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका म्हणाली.
सर्व गोष्टी माझ्या डोळ्यासमोरून गेल्या…
पहाटेचा व्यायाम आणि सरावाचे सत्र, सामन्यांपूर्वीची अस्वस्थता, संघ निवडीचा ताण, सततचे सामान भरणे आणि काढणे, शिस्त, त्याग, समर्पण… एक क्रिकेटपटू म्हणून तुझे आयुष्य ज्या गोष्टींनी घडवले, त्या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यासमोरून गेल्या, असंही राधिका म्हणाली. हे सर्व आता संपणार आहे, हा विचारच खूप भावूक करणारा होता आणि आता जेव्हा तो क्षण अखेर आला, असंही राधिका म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by Radhika Rahane (@radhika_dhopavkar)

मला तुझा प्रचंड अभिमान वाटतो – राधिका
मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, मला तुझा प्रचंड अभिमान वाटतो. केवळ मैदानावर तू मिळवलेल्या यशाबद्दलच नाही, तर या संपूर्ण प्रवासात तू माणूस म्हणून जसा राहिलास, त्याबद्दलही मला तुझा अभिमान वाटतो, असंही राधिका म्हणाली. तुझ्या या प्रवासाचा एक भाग होता आले आणि तो इतक्या जवळून पाहता आला, याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे, असं म्हणत राधिकाने भावना व्यक्त केल्या.
नावाप्रमाणेच खंबीर राहिलास
तुझ्या प्रवासाने केवळ मलाच नाही, तर हा खेळ पाहणाऱ्या लाखो लोकांनाही प्रेरणा दिली आहे. तू क्रिकेटसाठी तुझे तन-मन अर्पण केलंस आणि त्या बदल्यात तुला अशा आठवणी मिळाल्या आहेत ज्या आयुष्यभर सोबत राहतील. चढ-उतारांच्या प्रत्येक टप्प्यावर तू तुझ्या ‘अजिंक्य’ (अजेय) या नावाप्रमाणेच खंबीर राहिलास. पुढच्या टप्प्यात काहीही असले तरी, आर्या, राघव आणि मी नेहमीच तुला प्रोत्साहन देत राहू , असं म्हणत राधिका भावुक झाली.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर