बातमी ऐका (Marathi Voice Reader)
Parwinder Singh Jhota shot dead Bathinda : ‘उडता पंजाब’ या सिनेमाने पंजाबमधील आमली पदार्थाविरूद्धची लढाई समोर आणली होती. पंजाबमध्ये आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही. याविरुद्ध अनेकांना आजपर्यंत आवाज उठवलेला आहे. अशातच पंजाबच्या मानसा येथे सोमवारी सकाळी अंमली पदार्थ विरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची एका मेडिकल स्टोअर मालकाने गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अँटी ड्रग टास्क फोर्सचे प्रमुख, प्रसिद्ध समाजसेवक आणि माजी कबड्डीपटू परविंदर यांची फेसबूक लाईव्ह सुरू असताना हत्या करण्यात आली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
परमिंदर यांच्यावर गोळी झाडली
परमिंदर सिंग झोटा हे अत्यंत खंबीर, धाडसी आणि पुरोगामी विचारांचे तरुण सामाजिक कार्यकर्ते होते, ज्यांनी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध लढा दिला. मानसा येथील एका मेडिकल स्टोरवर नशेविरोधात आवाज उठवण्यासाठी परविंदर सिंह गेले असताना स्टोर मालकाने पिस्तुलचा वापर करत परमिंदर यांच्यावर गोळी झाडली. यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. परमिंदर यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून आपलं स्टिंग ऑपरेशन चालू ठेवलं होतं. पण त्यांचा मृत्यू या लाईव्हमध्ये कैद झाला.
Shraddha Dubey : बिझनेसमॅन शिवा शर्मा मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट! पोलिसांच्या हाती लागलं श्रद्धाच्या फ्लॅटमधून पडतानाचं CCTV फुटेज
सकाळी 9:00 च्या सुमारास काय घडलं?
सदर घटना सकाळी 9:00 च्या सुमारास घडली. परविंदर शहराच्या रेल्वे क्रॉसिंगजवळील एका मेडिकल स्टोअरचे मालक अश्विनी यांच्याकडे गेले आणि त्यांच्यावर अंमली पदार्थ विकण्याचा आरोप करत त्यांच्याशी वाद घालू लागले. हा वाद इतका वाढला की स्टोअर मालकाने थेट पिस्तुलच काढली अन् काहीही विचार न करता गोळी झा़डली. गोळी लागल्यानंतर, परविंदर जीव वाचवण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे पळाले आणि जवळच्या एका दुकानात कोसळले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण त्यांचा जीव वाचू शकला नाही.
पंजाब में नशे के खिलाफ आवाज उठाने वाले परविंदर सिंह की गोली मारकर हत्या! परविंदर के पिताजी ने AAP सरकार और मानसा के विधायक विजय सिंघल पर गंभीर आरोप लगाए है। वहीं, परविंदर की मां का दावा है कि परिवार को जान से मारने की धमकियां मिल रही थीं।
अरविंद केजरीवाल और भगवंत मान, जवाब दो!
– पंजाब में नशे के खिलाफ लड़ना जान जोखिम में डालना क्यों बन गया है?
– नशे के कारोबार पर लगाम लगाने के बजाय आवाज उठाने वालों की सुरक्षा भी नहीं कर पा रही AAP सरकार?
– आखिर इस नाकामी की जिम्मेदारी कौन लेगा?
— BJP (@BJP4India) October 13, 2026
#WATCH | Chandigarh | On an anti-drug activist allegedly shot dead in Mansa, SAD leader Daljit Singh Cheema says, "The murder of Parvinder Jhota in Mansa, Punjab, today shook everyone’s spirits. He was a social activist, leading a movement against drugs and exposing those involved in the drug trade. He continued this work for five or six years. Whenever he received a complaint of drug abuse, he would go there and protest. The police even sent him to jail several times… Today, a chemist involved in the drug trafficking, pulled out a pistol and shot him while he was being interviewed live. This is a living example of the state of law and order in Punjab… The police themselves are not safe, and anti-drug activists are not safe. So, how is Bhagwant Mann’s government fighting the war against drugs? The government must take responsibility for this…"
— ANI (@ANI) October 13, 2026
पंजाबमध्ये खुद्द पोलीस सुरक्षित नाहीत?
अंमली पदार्थांचा व्यापार थांबवण्यासाठी आणि मदतीसाठी पोलिसांना फोन केला असता, पोलीस जागे झाले नाहीत आणि कोणीही मदतीला आले नाही. आम आदमी पार्टीने आज पंजाबमध्ये अशी परिस्थिती निर्माण केली आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तर पंजाबमध्ये खुद्द पोलीस सुरक्षित नाहीत आणि अंमली पदार्थ विरोधी कार्यकर्तेही सुरक्षित नाहीत. मग, भगवंत मान यांचे सरकार अंमली पदार्थांविरुद्धचे युद्ध कसे लढत आहे? सरकारने याची जबाबदारी घेतलीच पाहिजे, असं SAD नेते दलजित सिंग चीमा यांनी म्हटलं आहे.