ब्रेकिंग न्यूज
⚡ मारेगावच्या विद्यार्थी चळवळीला नवे नेतृत्व! आनंद काकडे NSUIच्या तालुकाध्यक्षपदी ✦ ⚡ Tiger Shroff : धडाधड ७ गोळ्या झाडूनही सेफ…टार्गेटवर असूनही टायगर श्रॉफचा जीव कसा वाचला! समोर आली शॉकिंग म… ✦ ⚡ डेटिंग ॲपवर ओळख, आधी संबंध ठेवले, मग महिलेनं केलं भयंकर कांड , छत्रपती संभाजीनगरमधील खळबळजनक घटना ✦ ⚡ IND vs ZIM : 54 बॉलमध्ये नुसती मॅच जिंकली नाही तर केला रेकॉर्ड, स्मृतीच्या कॅप्टन्सीत पहिलाच मालिका विजय ✦ ⚡ मारेगावात युवा व्यापारी दुर्गोत्सव मंडळातर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन! ✦ ⚡ ‘आता पुढचा नंबर तुझा’, प्रदीप पूर्णेकरांनंतर कुटुंबातील तरुणीला जीवे मारण्याची धमकी ✦ ⚡ मध्यरात्रीची वेळ, अनोळखी स्पर्श पाहून शेतकऱ्याची पत्नी ओरडतच उठली, त्यानं तोंडात बोळा कोंबला अन्…, सोलापू… ✦ ⚡ News 18 Marathi Headlines | 17 OCT | 9 AM | Abhijit Dipke | Fadnavis | Sanap | Maharashtra Politics ✦ ⚡ पतीसोबत भांडण, पत्नीनं फेसबुकवर ज्योतिषी शोधला, 9 महिन्यांनी कळालं कांड, नवी मुंबईत शॉकिंग प्रकार ✦ ⚡ खवय्यांच्या ताटातून इंद्रायणी भात गायब होणार? मावळचा शेतकरी संकटात, तांदूळ महागण्याची शक्यता
SP News Maregaon

Nashik Crime : जेलमधून बाहेर येताच झाला गेम, भरदिवसा टपरीवर उभा असताना हल्ला अन् सुमित परागेला संपवलं!

10 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Nashik Crime News : नाशिक येथील नाशिकरोड परिसरातील जुन्या बिटको रुग्णालयाजवळ एका टपरीवर उभे असलेल्या सुमित पगारे याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक प्राणघातक हल्ला केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र घबराट पसरली असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सुमित पगारे हा रुग्णालयाजवळील एका टपरीवर उभा असताना अचानक आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. काही समजण्याच्या आतच आरोपींनी त्याच्यावर रोखून गोळीबार केला. या थरारक हल्ल्यादरम्यान एक गोळी थेट सुमित याच्या पोटात घुसली, तर दुसरी गोळी त्याच्या बाजूने सुटून गेली. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात मोठी धावपळ उडाली आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. या संधीचा फायदा घेत हल्लेखोराने घटनास्थळावरून तातडीने पोबारा केला. गोळी लागल्याने सुमित पगारे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला.

​स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत गंभीर जखमी सुमित याला उपचारासाठी तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, पोटात गोळी लागल्याने झालेला अतिरक्तस्राव आणि गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

​घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि तपास पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून पहाणी सुरू केली आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचा माग काढण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर