ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

विद्युत तार चोरट्याना अटक 8 लाखाचा मुद्देमाल जप्त.

105 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगांव तालुक्यातील बोटोणी-खडकी ( खडकी-) मारेगाव शिवारात दिनांक 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान विद्युत खांबावरील तार चोरी गेल्याची तक्रार अतीकार्य अभियंता उप विभाग महापारेषण यवतमाळ यांनी मारेगाव पोलीस स्टेशनला दिनांक १२ ऑक्टोबर 2022 रोजी दिली होती.

तक्रारीवरून पोलीसांनी तपासाचे चक्र वेगाने फीरवित दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दहेगाव व वणी येथुन चार संशयितांना अटक केली असून 8 लाख 8 हजार 317 रुपयाचा मुद्देमाल संशियीता कडून जप्त करण्यात मारेगांव पोलीसांना यश आले आहे. बोटोणी खडकी मारेगांव शिवारातील विद्युत खांबावरील ॲल्युमिनियम तार 5 हजार 616 किलो, लोखंडी खांब व ॲसेसीरीज वजन 6 हजार 530 किलो एकुण वजन 12 हजार 146 किलो असुन 95 हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची तक्रार महा पारेषण कडुन दिनांक 12 ऑक्टोंबर 2022 रोजी देण्यात आली होती.

मारेगाव पोलीसांनी तपासाचे चक्र वेगात फीरवित व गोपनीय माहीतीच्या आधारे दहेगाव व वणी येथुन विशाल शंकर परचाके (22) दहेगाव ता. वणी, योगेश जयराम येसांबरे वणी, दादाराव चेंडकु टेकाम पेंढरी, दिलीप भाऊराव कुचनकर वणी या संशयितांना ताब्यात घेतले असून दोन्ही गुन्ह्याची कबुली दिली. महा पारेषणच्या वरील मुद्देमालापैकी संशयितांकडुन 99 कीलो ॲल्युमिनियम तार किंमत 8 हजार 317 रुपये व गुन्हातील वाहन अंदाजे कींमत रुपये 8 लाख असा एकुण 8 लाख 8 हजार ३१७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन संशयिता चा पी सी आर घेण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनात सहा.पोलीस निरीक्षक राजेश पुरी, पोउनि ज्ञानेश्वर सावंत, पोहेकाँ आनंद अलचेवार, सहा.पोउनी प्रमोद जिड्डेवार, नापोकाँ अफजल पठाण, रजनीकांत पाटील यांनी या कारवाई मध्ये महत्व पूर्ण कामगिरी बजावली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर