ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शेत मजुराची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

96 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

हटवांजरी (पोड) येथील घटना

सुरेश पाचभाई मारेगांव,

मारेगाव तालुक्यातील खापरी येथील एका 40 वर्षीय शेतमजुराने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.अंकुश महादेव मडावी वय सुमारे 40 वर्ष रा.खापरी असे आत्महत्या केलेल्या शेत मजुराचे नाव आहे.

अंकुश हा हटवांजरी (पोड) येथे सासुरवाडीला राहायचा आणि शेत मजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. काल दिनांक 26 डिसेंबर 2023 रोज मंगळवारला दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास सासऱ्याच्या शेतात त्याने मोनोसिल नावाचे विषारी कीटक नाशक प्राशन केले.कुटुंबातील सदस्यांच्या व बाजुच्या शेतकऱ्याच्या सदर घटना लक्षात येताच त्याला लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.



पण तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविले होते.पण चंद्रपूर येथे उपचारादरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यु झाला.
त्याचेवर आज दिनांक 27 डिसेंबर 2023 रोज बुधवारला खापरी येथे जन्म गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असुन

मृतक अंकुश यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा असा आप्त परिवार आहे.मृत अंकुश यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असुन एका तरुण शेतमजुराने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलल्याने खापरी व हटवांजरी (पोड)परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर