ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

शेतकऱ्याची अतिवृष्टीमुळे नैराश्यातून आत्महत्या

1.9k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

रोहपट (डुबली पोड) येथील घटना

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव तालुक्यातील रोहपट (डुबली पोड) येथील भीमा तुकाराम आत्राम (वय ६१) या शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेले नुकसान आणि आर्थिक अडचणींमुळे नैराश्येतून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. २७ ऑक्टोबर २०२५) सकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, भीमा आत्राम हे शेतीवर उदरनिर्वाह करणारे परिश्रमी शेतकरी होते. सोमवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. काही वेळानंतर घरी आले व मुलांना सांगितले यावर्षी शेतातील पिकांचे काही खरे नाही असे म्हणून जमिनीवर कोसळले असता मृतक यांना झालेल्या उलटीचा कीटकनाशकाचा वास येत असल्याने त्यांना कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ मारेगाव  ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

भीमा आत्राम यांच्या ताब्यात सुमारे सात एकर शेती होती. यंदाच्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील सर्व पीक पूर्णतः नष्ट झाले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक संकटात आणि मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

मृत भीमा तुकाराम आत्राम यांच्या पश्चात एक मुलगा, सून आणि नातवंड असा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे रोहपट परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे शोकाकुल कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर