ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार

21 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोल्हापूर: चारित्र्याच्या संशयावरून सुरू झालेल्या भांडण खुनी हल्ल्यावर गेल्याने कोल्हापूर हादरलं. हुपरी – पट्टणकोडोली मार्गावर पतीने पत्नीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात सुजाता श्रीशैल्य पुजारी (वय 30, रा. गणेश माळ, हुपरी) गंभीर जखमी असून त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. रहदारीच्या मुख्य रस्त्यावरच घडलेल्या या घटेनेनं परिसरात खळबळ उडाली.

नेमकं घडलं काय?

पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीशैल गुरव हा मूळचा कर्नाटकातील रहिवासी आहे. तीन महिन्यांपूर्वी हुपरी येथील गणेशमाळ परिसरात पत्नी आणि दोन मुलांससह भाड्याच्या घरात राहण्यास आला. बुधवारी पत्नी सुजाता हिला घेऊन मोपेडवरून तो पट्टणकोडोलीकडे निघाला होता. तेव्हा तळंदगे फाट्याजवळ थांबले असता त्यांच्यात वाद सुरू झाला. श्रीशैल याने रस्त्यावरच सुजाताला मारहाण आणि शिवीगाळ सुरू केली. तेव्हा सुजाता हिने घाबरून जात बचावासाठी जवळच्या हॉटेलकडे धाव घेतली.

आईसोबत असं कोण वागतं? सांगलीत पोलीस ठाण्यासमोर थरार, 23 वर्षाच्या मुलानं…, तळपायाची आग मस्तकात जाईल

सुजाता हॉटेलकडे गेली असता श्रीशैल याने पाठलाग सुरू केला. सुजाताला पकडून तिच्या गळ्यावर कटरसारख्या धारदार शस्त्राने वार केला. हल्ल्यात रक्तबंबाळ झालेली सुजाता जिवाच्या आकांताने ओरडत रक्ताच्या थारोळ्यात पडली. आवाज ऐकून परिसरातील लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. श्रीशैल याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने त्यांच्यावरही धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शस्त्र तिथेच टाकून तो मोपेडवरून पसार झाला.

गंभीर जखमी अवस्थेत सुजाता हिला नागरिकांनी दुचाकीवरून पट्टणकोडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे तिची प्रकृती चिंताजनक बनली होती. प्राथमिक उपचारानंतर नातेवाईकांनी 108 रुग्णवाहिकेतून तिला तातडीने सीपीआर येथे दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत जमाव पांगला होता. त्यानंतर रात्री उशिरा घटनेची नोंद हुपरी पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस पती श्रीशैल गुरव याच्या मागावर आहेत. हल्लेखोराच्या शोधासाठी कर्नाटकात पोलीस पथक पाठवण्यात आले असून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर