बातमी ऐका (Marathi Voice Reader)
India vs Zimbabwe : रायपूरच्या शहिद वीर नारायण स्टेडिअमवर झिम्बाबेने दिलेले 102 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने अवघ्या 54 बॉलमध्ये गाठत हा सामना 9 विकेट राखून जिंकला आहे.विशेष म्हणजे हा सामना जिंकून टीम इंडियाने एक रेकॉर्ड देखील केला आहे. टीम इंडियाने 67 बॉल राखून हा सामना जिंकला आहे. वुमेन्स टी20 क्रिकेटमध्ये आजपर्यंत कुणालाचा इतक्या बॉल राखून विजय मिळवला आहे. त्यामुळे स्मृती मानधनाच्या नेतृत्वात टीम इंडियाने इतिहास रचला आहे. तसेच स्मृती मानधनाचा हा तिच्या टी20 कॅप्टन्सीतला पहिला मालिका विजय आहे.
खरं तर झिम्बाबाने दिलेल्या 102 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडियाकडून शफाली वर्मा आणि स्मृती मानधना मैदानात उतरली होती.या दोन्ही खेळाडूनी आक्रामक खेळी करून पहिल्या विकेटसाठी 96 धावांची पार्टनरशीप केली होती. पण शफाली वर्मा 25 बॉलमध्ये 55 धावा करून बाद झाली होती. त्यानंतर स्मृती मानधना 47 वर नाबाद राहिली तिच्यासोबत अनुश्का शर्मा नाबाद होती. टीम इंडियाने हे लक्ष्य 53 बॉल पूर्ण करत हा सामना जिंकला.
झिम्बाबेच्या डावाबद्दल बोलायचं झालं तर चिपो टीरीपानोने सर्वाधिक 34 तर जोसेफिन नकोमोने 27 धावांची खेळी केली होती. या व्यतिरीक्त इतर खेळाडू एकेरी धाव करून बाद झाले होते. त्यामुळे झिम्बाबे 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 102 धावाच करू शकली होती. यावेळी टीम इंडियाकडून निक्की प्रसादने सर्वाधिक 2 तर क्रांती गौड, नंदीनी शर्मा, दिप्ती शर्मा आणि श्री चरणीने प्रत्येकी 1 विकेट मिळवली होती.
टीम इंडियाने 67 बॉल राखून हा सामना जिंकला आहे. वुमेन्स टी20 क्रिकेटमध्ये आजपर्यंत कुणालाचा इतक्या बॉल राखून विजय मिळवला आहे. त्यामुळे स्मृती मानधनाच्या नेतृत्वात टीम इंडियाने इतिहास रचला आहे. तसेच स्मृती मानधनाचा हा तिच्या टी20 कॅप्टन्सीतला पहिला मालिका विजय आहे.