ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

कला वाणिज्य व विज्ञान क. महाविद्यालय मारेगाव ची विध्यार्थिनी वर्षा आत्रामची भाला फेक मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

87 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव दिनांक 24 जानेवारी 2023 रोज मंगळवारला यवतमाळ येथील नेहरू स्टेडियम येथे पार पडलेल्या विभागीयस्तरीय 19 वर्षाखालील खेळामध्ये मध्ये कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगावची 11 वि कला शाखेची विध्यार्थीनी वर्षा विनोद आत्राम हिने भाला फेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवीला आहे.

त्यामुळे तिने प्राप्त केलेल्या यशामुळे तिची निवड राज्यस्तरीय भाला फेक स्पर्धेसाठी झाली आहे.तिने मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल तिचे विविध स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.
वर्षा ही मारेगाव तालुक्यातील खंडणी येथील रहिवाशी मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल आहे.तसेच विकासच्या दृष्टीने इतर तालुक्याच्या तुलनेत मागासलेला आहे.

तरी सुद्धा खंडणी सारख्या लहानशा गावातून येऊन तिने मिळवलेले यश हे खरच कौतुकास्पद आहे.तिला मुळातच लहान पणा पासून मैदानी स्पर्धेमध्ये आवड असल्यामुळे ती नियमित पणे सराव करत होती.वर्षा ही विध्यार्थ्यांनी ग्रामीण भागातून येतात तसेच सामान्य शेतकरी कुठंबातील आल्यामुळे तिचे विशेष करून कौतुक केले जात आहे.

मारेगाव तालुका हा इतर तालुक्याच्या तुलनेत काही प्रमाणात मागासलेला समजला जातो परंतु असे असून सुद्धा कला वाणिज्य विज्ञान क.महाविद्यालयात विध्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचं काम सर्व प्राध्यापकाकडून वेळोवेळी केल जात.महाविद्यालयांचे असलेलं भव्य मौदान विध्यार्थ्यांचा खेळप्रति उत्साह द्विगुणित करते.

विध्यार्थांकडून नियमित पणे क्रीडा शिक्षकाने करून घेतलेला सराव तसेच विध्यार्थांची खेळप्रति असलेली तळमळ,आत्मीयता या सर्व बाबींमुळे वर्षाने यश संपादन केलेलं दिसून येतात. त्यामुळे तिच्या या कठीण मेहनतीचे तिला फळ मिळालेलं आज झालेल्या स्पर्धेत तिने प्राप्त केलेल्या यशातून निदर्शनास येते.


तिने तिच्या यशाचे श्रेय मारेगाव तालुका क्रीडा संयोजक काकडे सर व महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी सर तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद आणि तिच्या आई वडिलांना दिले आहे .

वर्षा ने मिळवलेल्या यशाबदल संस्थेचे अध्यक्ष जिवन पाटील कापसे सर व प्राचार्य हेमंत चौधरी सर व तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी वर्षा चे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर