बातमी ऐका (Marathi Voice Reader)
West Indies Squad For India Tour : आगामी वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीकोनातून टीम इंडियासाठी वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा देखील केली आहे. अशातच आता वेस्ट इंडिज संघाची देखील घोषणा झाली असून वेस्ट इंडिजने वनडे आणि टी-ट्वेंटी संघ जाहीर केले आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजने नवे प्रयोग केले असून तीन खुंखार खेळाडूंना संधी दिली आहे. तर एका 30 वर्षाच्या पोराचा डेब्यू करण्यात आला आहे.
कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये धमाका करणाऱ्या संधी
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 27 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान तीन एकदिवसीय आणि पाच टी-ट्वेंटी सामने खेळले जातील. हे सामने आठ शहरांमध्ये खेळवले जातील. अशातच आता वेस्ट इंडिज संघात कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या युवा सलामीवीर कामिल पूरन याला पहिल्यांदाच टी-ट्वेंटी संघात स्थान मिळालं आहे. त्याने सीपीएल 2026 मध्ये आठ डावांत 160 च्या स्ट्राइक रेटने 273 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता त्याला थेट नॅशनल टीममध्ये संधी मिळाली आहे.
Rohit Sharma कारण नाहीच! BCCI सिलेक्शन कमिटीमध्ये नवा ड्रामा, Ajit Agarkar च्या राजीनाम्याची Inside Story
हेटमायरचा संघात समावेश
तसेच पाच सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी शिमरन हेटमायरचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेतही चांगली कामगिरी केली होती. त्याचबरोबर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटचे दोन एकदिवसीय सामने चुकवल्यानंतर सलामीवीर जॉन कॅम्पबेलचे एकदिवसीय संघात पुनरागमन झालं आहे.
डॅरेन सॅमी काय म्हणाला?
वेस्ट इंडिजने मोठा निर्णय घेतला असून ज्वेल अँड्र्यूचा दोन्ही संघांमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर जेसन होल्डरला विश्रांती देण्यात आल्याने, भारत दौऱ्यासाठीच्या दोन्ही संघांमधून वगळण्यात आलं आहे. भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्धची मालिका खेळाडूंना महत्त्वाच्या भूमिकांसाठी तयारी करण्याची संधी देईल, असं हेड कोच डॅरेन सॅमी म्हणाला आहे.
वेस्ट इंडिजची वनडे टीम – शाय होप (कॅप्टन), ज्वेल अँड्र्यू, जॉन कॅम्पबेल, कीसी कार्टी, रॉस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जस्टिन ग्रीव्ह्स, अमीर जांगू, अल्झारी जोसेफ, शमर जोसेफ, विटेल लॉज, गुडाकेश मोती, कीमो पॉल, शेर्फेन रदरफोर्ड, जेडन सील्स.
वेस्ट इंडिजची टी-ट्वेंटी टीम – शाई होप (कॅप्टन), ज्वेल अँड्र्यू, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, अकेल होसेन, शामर जोसेफ, गुडाकेश मोती, कीमो पॉल, कामिल पूरन, रोवमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, क्वेंटिन सॅमसन, रोमॅरियो शेफर्ड, शमर स्प्रिंग.
IND vs WI ODI मालिका शेड्युल
1st ODI: 27 सप्टेंबर 2026 – तिरुवनंतपुरम
2nd ODI: 30 सप्टेंबर 2026 – गुवाहाटी
3rd ODI: 3 ऑक्टोबर 2026 – चंदीगड
IND vs WI T20I मालिका शेड्युल
1st T20I: 6 ऑक्टोबर 2026 – लखनऊ
2nd T20I: 9 ऑक्टोबर 2026 – रांची
3rd T20I: 11 ऑक्टोबर 2026 – इंदौर
4th T20I: 14 ऑक्टोबर 2026 – हैदराबाद
5th T20I: 17 ऑक्टोबर 2026 – बंगळुरू.