ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

हिवरी येथे सीआरए तंत्रज्ञानाद्वारे फळबाग लागवड

1.4k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आधुनिक शेतीकडे वाटचाल

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत १ हेक्टर क्षेत्रावर चिकू फळपीकाची लागवड करण्यात आली. तालुका कृषि अधिकारी दीपाली खवले यांच्या उपस्थितीत शेतकरी श्री. रमेश वासुदेव कळसकर यांच्या शेतात ही लागवड झाली.

या वेळी हवामान अनुकूल सीआरए (CRA) फळबाग लागवड तंत्रज्ञानावर प्रात्यक्षिक घेण्यात आले. या तंत्रज्ञानामुळे मुळांना थेट अन्नद्रव्ये व पाण्याचा पुरवठा होऊन दुष्काळी व माळमाथ्यावरील भागातही झाडांची चांगली वाढ होते, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी दिपाली खवले यांनी केले.

सहाय्यक कृषि अधिकारी तुषार मेश्राम यांनी सीआरए तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. या पद्धतीत २ बाय २ फूट रुंद व २ फूट खोलीचे खड्डे तयार करून त्यात गांडूळ खत, ट्रायकोडर्मा, शेणखत व वाळू टाकून रोपे लावली जातात. खड्ड्याच्या चारही कोपऱ्यात ३ फूट उंच पीव्हीसी पाईप बसवले जातात.

त्याद्वारे पाणी व खते थेट मुळांपर्यंत पोहोचवली जातात. परिणामी झाडांची निरोगी वाढ होऊन उत्पादनात वाढ होते.यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी शासनामार्फत विविध योजना उपलब्ध असल्याची माहिती देत, या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी अधिकारी दिपाली खवले यांनी केले.

दरम्यान कपाशी पिकावरील मित्रकिडींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. क्रायसोपा व लेडी बर्ड बिटल या उपयुक्त कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे. क्रायसोपा एका दिवसात सुमारे ४६ शत्रूकिडींचे भक्षण करते, तर लेडी बर्ड बिटल ४० ते ५० मावा किडी खातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी मित्रकिडींचे संवर्धन करावे, असा संदेश कृषि सेवक सनद घोसळकर यांनी दिला .

तसेच फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.या कार्यक्रमाला शेतकरी रमेश कळसकर, गणेश कळसकर, प्रदीप नगराळे, गणेश कोवे आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर