ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

शेतकरी एकत्र येत नाही तोपर्यंत विकास शक्य नाही राहुल चव्हाण

418 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मार्डी येथे बेंबळा पाटबंधारे विभाग व ज्ञानसाधना शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात काढले उद्गार

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव:- शेतकरी एकत्र येत नाही तोपर्यंत विकास होत नाही. कारण सामूहिक शेती आणि शेतीसाठी लागणारी साधने यांचा पुरवठा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आवश्यक आहे. जोपर्यंत शेतकरी फळपिके घेत नाही तोपर्यंत शेतीची क्रांती होत नाही, असे उद्गार राहुल चव्हाण, विषय तज्ञ, कृषी अभियांत्रिकी यवतमाळ यांनी काढले.

ते बेंबळा पाटबंधारे विभाग व ज्ञानसाधना शिक्षण संस्था यवतमाळ यांचे संयुक्त उपक्रमा अंतर्गत पाणी वापर संस्थेच्या पदाधिकारी,लाभार्थी यांची वार्षिक आढावा सभा आणि एक दिवसीय कार्यशाळेमध्ये बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तेजस चिमोटे उपविभागीय अधिकारी,

बेंबळा विभाग, उद्घाटक मनीष भानवे सचिव बेंबळा विभाग, प्रमुख पाहुणे म्हणून रामटेके मॅडम वैद्यकीय अधिकारी मार्डी, सुधीर जवादे, डिमन टोंगे, दत्तात्रय खीरटकर, वाल्मीक गाडगे, बेंबळा पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राहुल चव्हाण म्हणाले की,पडणाऱ्या पावसाचे योग्य नियोजन झाले तरच ओलिताची क्षमता वाढेल. सध्या महाराष्ट्र मध्ये 40 ते 44% शेती ओलीताखाली आहे.कोणत्या सिंचन पद्धतीमध्ये कोणती पिके घ्यावी याचीही त्यांनी माहिती दिली. ज्या भागात जास्त पाऊस पडतो तिथे ठिबक सिंचन योजना वापरावी.

पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर केला तर जास्त ओळीत होऊ शकते तसेच टोळधाड सारख्या किडीला टाळण्यासाठी ड्रोन चा वापर अतिशय महत्त्वाचा आहे असे ते पुढे म्हणाले.यावेळी संस्थेचे सचिव मनीष भानवे यांनीही उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन मनोज पवार प्रास्ताविक मनीष भानवे तर आभार भाऊराव मेघावत यांनी मानले.

कार्यक्रमाला पाणी वापर संस्थेचे सर्व सभासद आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिया नाकाडे,प्रतीक लालसरे, वैभव लालसरे, अक्षय बुचुंडे, स्नेहा कावडे,शिवानी वगारे,परमेश्वर आडे,अनिकेत जोगदंड, सारंग चव्हाण यांनी सहकार्य केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर