ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

अडेगाव येथे शेतकऱ्यांचे रस्त्यासाठी आंदोलन

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

२८ जानेवारीपासून बेमुदत उपोषण

ज्ञानेश्वर आवारी | झरी जामणी

झरी जामणी तालुक्यातील मौजा अडेगाव (खंड क्रमांक १) येथील सर्व्हे क्रमांक ५१ मधील शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा पारंपरिक वहिवाटीचा रस्ता कथितरीत्या बेकायदेशीररीत्या बंद करण्यात आल्याने परिसरात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा, या मागणीसाठी आज दिनांक २८ जानेवारी २०२६ पासून अडेगाव येथील शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

या प्रकरणी अडेगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले असून, त्यामध्ये नमूद केल्यानुसार १५ जानेवारी २०२६ रोजी तहसीलदार, झरी जामणी यांच्याकडे रस्ता खुला करून देण्याबाबत लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, लोधा सोलर प्लॅन्ट कंपनीने शेतात जाणारा पारंपरिक वहिवाटीचा रस्ता जाणीवपूर्वक बंद केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे १६ जानेवारी २०२६ रोजी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून संबंधित रस्ता मोकळा ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. असे असतानाही, सदर आदेशांचे उल्लंघन करून रात्रीच्या सुमारास पुन्हा रस्ता बंद करण्यात आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.


याशिवाय, कंपनी परिसरातून जाणारा रस्ता सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बंद करण्यात आल्याचा आरोप शेतकरी दिवाकर दादाजी काळे यांच्यावर करण्यात आला असून, सदर अतिक्रमण तात्काळ हटवून रस्ता पूर्ववत खुला करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी प्रशासनाला २७ जानेवारी २०२६ पर्यंत रस्ता खुला करून देण्याची अंतिम मुदत दिली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने २८ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, असेही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

या निवेदनाच्या प्रती तहसीलदार झरी जामणी, ठाणेदार मुकुटबन, पोलीस अधीक्षक यवतमाळ, उपविभागीय अधिकारी पांढरकवडा तसेच राज्याचे महसूल मंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत. प्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देणार की आंदोलन तीव्र होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर