ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

संजय खाडे यांची वेकोलि नागपूरच्या सुरक्षा समिती सदस्यपदी नियुक्ती

614 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कर्मचारी व वे.को.लि.भागातील समस्या सोडवण्याचे खाडे यांचे वचन

तालुका प्रतिनिधी वणी

वणी – संजय खाडे यांची वे.को.लि नागपूरच्या सुरक्षा समिती सदस्यपदी (टी.एस.सी मेंबर) नियुक्ती करण्यात आली. यानिमित्त वणीतील एएसएल लॉन येथे कोयला क्षेत्रीय सभा (वणी क्षेत्र) अंतर्गत प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाला हिंद मजदूर सभा H.M.S. युनियन व वणी क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.यावेळी संजय खाडे यांनी वे.को.लि कर्मचारी व वेकोलि भागातील अधिकाधिक समस्या सोडवण्याचे वचन दिले.संजय खाडे हे आपल्या नियुक्तीचे श्रेय एच.एम.एस. संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवकुमार यादव यांना देतात.

कार्यक्रमाला एचएमएस संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व कोयला श्रमिक सभेचे अध्यक्ष शिवकुमार यादव, शरद धांडे, महामंत्री व संचालन समिती सदस्य वेकोलि, दीपक जयस्वाल कोषाध्यक्ष व अध्यक्ष वेकोलि वणी क्षेत्र, विकास सोनटक्के महामंत्री, वणी क्षेत्र यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी उपस्थित मान्यवरांनी कामगारांचे हक्क, कामगार कल्याण व संघटनेच्या मजबुतीवर चर्चा केली. मोठ्या पदामुळे आता जबाबदारी वाढली आहे. वेकोलिच्या सर्व स्तरातील कर्मचा-यांच्या समस्या सोडवण्यासाठी व वेकोलि भागातील समस्या सोडवण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करणार, असे वचन संजय खाडे यांनी दिले.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वेकोलि खाण क्षेत्रातील कामगार उपस्थित होते. वेकोलिच्या सुरक्षा समितीचे सदस्य हे एक मोठे व जबाबदारीचे पद आहे. संजय खाडे यांच्या नियुक्तीमुळे वेकोलि कर्मचारीवर्गात समाधान व्यक्त होत आहे. खाडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर