ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

वणी येथील उद्धव ठाकरे यांचे सभेला उसळला अलोट जनसागर

1.2k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

महाराष्ट्रात गांडूळांची नाही वाघाची पैदास होते -उद्धव ठाकरे

वणी येथील जाहीर सभेत केले महाविकास आघाडीला निवडून देण्याचे आवाहन

तालुका प्रतिनिधी वणी

वणी येथील आज झालेल्या शासकीय मैदानावरील आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात गांडूळांची नाही तर वाघाची पैदास होते असे उद्गार काढले. कारण महाराष्ट्र हे मर्द मावळ्यांचे राष्ट्र आहे. येथे दुसऱ्यांना लुटल्या जात नाही तर लुटणाऱ्यांचे हात छाटले जाते ते वणी येथील आयोजित सभेमध्ये शिवसेना ( उबाठा ) चे तसेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान बोलत होते. यावेळी मंचावर खासदार प्रतिभा धानोरकर,परिसरातील उमेदवार आणि सर्व घटक पक्षाचे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की,मी वणीला उतरताच माझी बॅग तपासली.मी म्हटलं तपासा. पण तुमच्या बॅगा कोण तपासणार? हा तर लोकशाहीचा अधिकार आहे.आमच्या सोबत सत्ताधाऱ्यांच्याही बॅगा तपासा.कारण हा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा अधिकार आहे.पंतप्रधान वारंवार बोलतात की आम्ही कलम 370 रद्द केले. परंतु या 370 कलमचा महाराष्ट्राला काय फायदा?

महाराष्ट्रात जे आवश्यक आहे ते शेतकऱ्यांना भेटलं पाहिजे.इथे असलेल्या शेतमालाला भाव नाही. इथल्या कापसाला आणि सोयाबीनला भाव भेटला पाहिजे.मोदी शासनाने अदानीला शाळा दिली.एअरपोर्ट,बंदर दिले.वीज प्रकल्पसुद्धा दिले.पुन्हा काय काय देणार सांगता येत नाही.एकीकडे महाराष्ट्र लुटेंगे और दोस्तो मे बाटेंगे अशी पद्धत सुरू आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना चालू करू.पाच जीवनाश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेऊ.ज्यात तेल, साखर,गहू,तांदूळ आणि दाळ यांचा समावेश राहील. सर्वांना मोफत शिक्षण मिळेल आणि महाराष्ट्राला जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर