ब्रेकिंग न्यूज
⚡ मारेगाव–यवतमाळ महामार्गावर अज्ञात वाहनाची रोह्याला धडक! ✦ ⚡ घोडदरा शिवारात वाघाचे पगमार्क; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! ✦ ⚡ ‘एचआयव्ही’ग्रस्त असल्यानं पत्नी सोडून गेली; पुण्यात चुलत्यानं अल्पवयीन पुतणीवरच केला अत्याचार, जामीन अर्जाव… ✦ ⚡ IND vs NZ : केएल राहुल 5 रनवर असताना मैदानात मोठा ड्रामा… हेन्रीला कॅप्टनने वेड्यात काढलं, पण पुढच्या 2 म… ✦ ⚡ MPSC गट-क परीक्षेसाठी जम्बो भरती, तुम्ही करताय तयारी? अनुभवी विद्यार्थ्यांनी दिले 5 सिक्रेट टिप्स! Video ✦ ⚡ CRIME : ‘आई कुणीतरी मला ब्लॅकमेल करतंय’, हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरून 20 वर्षाच्या तरुणाचा संशयास्पद मृत… ✦ ⚡ Chandrapur News : चौकात मानवी कवटी, रुळाजवळ छिन्नविच्छिन्न मृतदेह; चंद्रपुरात खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलि… ✦ ⚡ Chandrapur News : चौकात मानवी कवटी, रुळाजवळ छिन्नविच्छिन्न मृतदेह; चंद्रपुरात खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलि… ✦ ⚡ Chandrapur News : चौकात मानवी कवटी, रुळाजवळ छिन्नविच्छिन्न मृतदेह; चंद्रपुरात खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलि… ✦ ⚡ अनैतिक संबंधांचा वाद, पत्नीला झोपेतच संपवलं, मग 65 वर्षाच्या पतीचं टोकाचं पाऊल, बीड हादरलं!
SP News Maregaon

Chandrapur News : चौकात मानवी कवटी, रुळाजवळ छिन्नविच्छिन्न मृतदेह; चंद्रपुरात खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलि…

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


चंद्रपूर: अत्यंत गजबजलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात एका अज्ञात पुरुषाचे कापलेले शीर आढळून आल्याने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास वेगाने सुरू केला असून मृत व्यक्तीबाबतची महत्त्वाची अपडेट पोलिसांनी दिली आहे.

इंदिरा गांधी चौकातील सौंदर्यीकरण केलेल्या पुतळ्याच्या मागील बाजूस केवळ पुरुषाचे कापलेले शीर पडलेले नागरिकांना दिसले. सकाळीच असे दृष्य आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. या धक्कादायक प्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक लॅबचे पथक आणि श्वानपथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

शहरातील वर्दळीच्या प्रियदर्शिनी चौक परिसरात मानवी कवटी आणि काही अंतरावरील रेल्वे रुळालगत छिन्नविच्छिन्न अवस्थेतील कुजलेला मृतदेह आढळल्याने बुधवारी सकाळी मोठी खळबळ उडाली. दोन्ही ठिकाणचे अवशेष एकाच व्यक्तीचे असल्याचे तपासात स्पष्ट झाले असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
तो मृतदेह कोणाचा?
शीर आणि धड वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्याने मृत व्यक्ती कोण असावी याची चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवली आहे. प्रभास जोगेंद्र सरकार (वय ७०, रा. बंगाली कॅम्प, चंद्रपूर) असे मृताचे नाव आहे. ते १३ नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. बुधवारी सकाळी प्रियदर्शिनी चौकात कवटी आणि जवळच रेल्वे रुळाजवळ कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मृतदेहाचे काही भाग जनावरांनी खाल्ल्यामुळे घटनास्थळी अत्यंत विदारक दृश्य होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. प्राथमिक तपासात दोन्ही ठिकाणी सापडलेले अवशेष प्रभास सरकार यांचेच असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, शवविच्छेदनात त्यांच्या शरीरावर कोणतीही जखम आढळली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मृत्यू नेमका कशामुळे झाला, रेल्वे रुळाजवळ मृतदेह कसा पोहोचला आणि कवटी चौकात कशी आली, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. रामनगर पोलीस ठाण्याचे पथक या घटनेचा सखोल तपास करत असून, वैद्यकीय अहवाल आणि तपासाच्या पुढील निष्कर्षांनंतरच या गूढ मृत्यूमागचे सत्य समोर येण्याची शक्यता आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर