ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सोमनाळा फाट्याजवळ भीषण अपघात : दुचाकीस्वार जागीच ठार, एक जखमी

3k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनिधी, वणी

वणी:तालुक्यातील सोमनाळा फाट्यापासून काही अंतरावर आज (11 डिसेंबर 2025) गुरुवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृतकाचे नाव प्रवीण तुळशीराम येरमे (वय 42, रा. पांढरकवडा,(पिसगाव)ता. मारेगाव) असे असून, त्यांचा चुलत भाऊ रवींद्र येरमे हे गंभीर जखमी झाले आहेत. प्रवीण यांच्या पश्चात आई ,वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण येरमे हे काही कामानिमित्त वणी येथे गेले होते. काम आटोपून मारेगावकडे परतत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकी (क्रमांक MH 29 AJ 6220) ला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत प्रवीण यांचा जागीच मृत्यू झाला, तर रवींद्र येरमे गंभीर जखमी झाले.

जखमींना रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी तत्काळ वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अज्ञात वाहनचालकाचा शोध घेत असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर