ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

वाघाच्या हल्ल्यात गोरा ठार, तर वगार जख्मी!

2.3k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बोटोणी येथिल जंगल परिसरातील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव


मारेगाव तालुक्यातील बोटोणी गावाच्या सभोवती जंगल परिसराने वेढा घातलेला असून गावातील गुराखी जंगला शेजारी पशुधन चारण्यासाठी नियमित जात असतात.अशातच काल दिनांक ९ डिसेंबर २०२४ रोज सोमवारला गुराखी नेहमी प्रमाणे सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास खैरगाव रस्त्या जवळील जाणबाच्या माळा शेजारी पशुधन सराईसाठी घेऊन गेले असता झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने एका गोऱ्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना काल सायंकाळी उघडकीस आली आहे.

तर दुसऱ्या गोऱ्याच्या पाठीवर पंजा मारला व वगाराला पण जख्मी केले,असून वगार वाघाच्या भीतीने सैरावैरा होऊन पसार झाले की,वाघाने पस्त केले याचा थांगपत्ता लागला नाही.

अशी आपबीती गुराखी अरुण नागोसे यांनी दिली.बोटोणी जंगल हा अतिशय घनदाट असून अधून मधून जंगलाचा राजा वाघोबाचे दर्शन नित्यनेमाने होत असून अनेकदा जनावरांवर वाघाने हल्ला करून कधी ठार तर कधी जखमी केल्याचे दिसुन येत आहे.

गोसावी सखाराम मोहजे यांच्या मालकीचे अंदाजे दीड ते दोन वर्षीय गोऱ्यावर  वाघाने हल्ला करून ठार केल्याने त्यांचे अंदाजे दहा हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.बोटोनी परिसरात वाघाची धास्ती चांगलीच असून पशुधन पालकाचे झालेल्या नुकसानीचा मोबदला लवकरात लवकर मिळावा अशी मागणी होत आहे.

“प्रतिक्रिया”
बोटोनी परिसरामध्ये वाघाचे वावर व अस्तित्व आहे. एका गोऱ्यावर वाघाने हमला करून ठार केल्याची घटना काल घडली आहे.त्यामुळे नागरिकांनी जंगलात व शेतात जात असताना आवाज करत जावे. एकट्याने शेतात किंवा जंगलात जाऊ नये. एकट्याने शेतात जायचे झालेच तर आवाज करत जावे. सकाळी ८ वाजताच्या आधी शेतात व जंगलात कोणीही जाऊ नये. व सायंकाळी अंधार पडण्याआधी शेतातून व जंगलातून शेतकऱ्यांनी लवकर घरी यावे असे आवाहन शंकर हटकर वनपरिक्षेत्र अधिकारी मारेगाव यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर