ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

पोलिस भरतीसाठी तरुणींना महापालिका देणार ‘ट्रेनिंग’:क्लासचे शुल्क भरणे अशक्य असल्याने मनपाचा पुढाकार, संभाजीनगरात राज्यातील पहिलाच उपक्रम

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यामध्ये १५ हजार ६३१ पदांसाठी पोलिस भरती होत आहे. यामध्ये साडेचार हजारांपेक्षा अधिक जागा मुलींसाठी राखीव आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील जास्तीत जास्त महिलांची निवड व्हावी यासाठी मनपाच्या महिला व बालविकास विभागाकडून शहरातील १८ ते ३३ वयोगटातील मुली व महिलांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. मनपा हद्दीतील रहिवासी, किमान १० वी उत्तीर्ण असलेल्या मुली व महिलांना या प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यातील अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी छत्रपती संभाजीनगर ही पहिलीच महापालिका असल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेने या उपक्रमाद्वारे महिलांना सुरक्षित, सक्षम व स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रशिक्षणादरम्यान शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, मुलाखत या सर्व स्तरांवर मार्गदर्शन केले जाईल. अर्जासोबत रहिवासी दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे जमा करावी लागतील. निवड झालेल्या उमेदवारांना नाममात्र १० टक्के (२,५०० हजार रुपये) शुल्कासह नियोजित ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी येत्या २२ डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर, तसेच विभागाच्या कार्यालयात संपर्क साधून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. त्याासाठी २२ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. मुदतीत अर्ज दाखल करण्याचे आवाहन महिला व बाल विकास विभागाने केले आहे. पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रांकडून २५ ते ३० हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. यामुळे अनेक गरीब विद्यार्थिनी भरतीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने हा उपक्रम सुरू केल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिस भरतीत राज्यात सर्वाधिक महिला शहरातील असतील – जी. श्रीकांत, आयुक्त, मनपा
शहरात पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गरीब कुटुंबातील मुलींना खासगी क्लासेसचे २५ ते ३० हजार रुपये शुल्क भरणे अशक्य असल्याचे जाणवले. त्यामुळेच अशा मुलींसाठी आम्ही पोलिस भरतीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अर्ज मागवण्यात आले असून लेखी व मैदानी चाचणी घेऊन निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यामुळे राज्यात होणाऱ्या भरतीमध्ये सर्वाधिक मुलींची संख्या ही आपल्या शहरातून असावी असा आमचा प्रयत्न आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर